जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पोलिसांची नावं लिहून ठेवा, सत्ता आल्यावर पाहून घेऊ -तावडे

पोलिसांची नावं लिहून ठेवा, सत्ता आल्यावर पाहून घेऊ -तावडे

पोलिसांची नावं लिहून ठेवा, सत्ता आल्यावर पाहून घेऊ -तावडे

07 फेब्रुवारी : सहसा शांतपणे बोलणारे भाजपचे नेते विनोद तावडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर लातूरमध्ये आक्रमक भाषण केलंय. पोलिसांच्या दंडुक्याचा मार मला आठवतो, त्यामुळे आता जर तुम्हाला पोलिसांनी अडवलं तर त्या पोलिसांना लक्षात ठेवा, त्यांची नावं लिहुन ठेवा पुढील सहा महिन्यात आपलं सरकार येतंय तेंव्हा त्यांना पाहून घेऊ असं चिथावणीखोर भाषण विनोद तावडेंनी केलंय. जाहिरात तावडे एवढ्यावर थांबले नाही तर आंदोलन जोरात करा, काय होईल ते पाहून घेऊ असे आदेशही तावडेंनी कार्यकर्त्यांनी दिले.

  • -MIN READ
  • Last Updated :

    4574 vinod tavade latur 07 फेब्रुवारी : सहसा शांतपणे बोलणारे भाजपचे नेते विनोद तावडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर लातूरमध्ये आक्रमक भाषण केलंय. पोलिसांच्या दंडुक्याचा मार मला आठवतो, त्यामुळे आता जर तुम्हाला पोलिसांनी अडवलं तर त्या पोलिसांना लक्षात ठेवा, त्यांची नावं लिहुन ठेवा पुढील सहा महिन्यात आपलं सरकार येतंय तेंव्हा त्यांना पाहून घेऊ असं चिथावणीखोर भाषण विनोद तावडेंनी केलंय.

    जाहिरात

    तावडे एवढ्यावर थांबले नाही तर आंदोलन जोरात करा, काय होईल ते पाहून घेऊ असे आदेशही तावडेंनी कार्यकर्त्यांनी दिले. लातूरमध्ये दयानंद कॉलेजच्या सभागृहात स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यावेळी तावडे बोलत होते. या कार्यक्रमात छावाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले आणि प्रदीप मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

    शेतकर्‍यांच्या प्रश्नी कोणत्याही मंत्र्यांने अडकाठी आणली तर त्या मंत्र्यांला आडवा पाडा असंही तावडे म्हणाले. तसंच राज्य सरकारने निवडणुकांच्या तोंडावर घोषणांचा सपाटा लावलाय पण या सर्व घोषणा फसव्या आहेत अशी टीकाही तावडेंनी केली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही आम आदमी पार्टीविरोधात बोलताना कुणी आडवं आलं तर मोडून काढा, असं चिथावणीखोर आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं. गडकरींच्या पावलावर पाऊल ठेवत कार्यकर्त्यांसमोर तावडेंनी पोलीस प्रशासनाविरोधात दंड थोपाटले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात