जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पुणे स्फोट दहशतवादी हल्ल्याचा संशय

पुणे स्फोट दहशतवादी हल्ल्याचा संशय

पुणे स्फोट दहशतवादी हल्ल्याचा संशय

11 जुलै : पुण्यात झालेल्या फरासखाना स्फोटामागे दहशतवाद्यांचा हात असल्याची शक्यता एटीएसने व्यक्त केली आहे. एटीएसने तपासाला सुरुवात केली असून प्राथमिक तपासातून हा अंदाज व्यक्त केलाय. या याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कलम 307, 324, 427, 120 ब आणि कलम 3,4, 5 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी स्फोटक कायद्यानुसार 16 - 18 गुन्ह्याच्या तपासासाठी दहा पथक तैनात करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    ff107 pune blast (3) 11 जुलै : पुण्यात झालेल्या फरासखाना स्फोटामागे दहशतवाद्यांचा हात असल्याची शक्यता एटीएसने व्यक्त केली आहे. एटीएसने तपासाला सुरुवात केली असून प्राथमिक तपासातून हा अंदाज व्यक्त केलाय.

    या याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कलम 307, 324, 427, 120 ब आणि कलम 3,4, 5 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी स्फोटक कायद्यानुसार 16 - 18 गुन्ह्याच्या तपासासाठी दहा पथक तैनात करण्यात आली आहे.

    जाहिरात

    घटनास्थळावर मिळालेले पुरावे तपासासाठी फोरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहे. प्रत्यक्ष साक्षीदार आणि इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आज पुण्यात दाखल झाले त्यांनी या प्रकरणी वरिष्ठ अधिकार्‍यांशी बैठक घेतली.

    पुणे स्फोटाचा तपास एटीएस करत आहे. आम्ही एटीएसच्या अहवालानंतर चित्र स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया सिंग यांनी दिली. गुरुवारी पुण्यात दगडूशेठ हलवाई मंदिरापासून काही अंतरावर दुपारी 2 च्या सुमारास फरासखाना पोलीस स्टेशनच्या पार्किंगमध्ये एका दुचाकीमध्ये स्फोट झाला. त्यात एका हवालदारासह 5 जण किरकोळ जखमी झालेत.

    या दुचाकीच्या डिकीमध्ये स्फोटकं ठेवल्याचा अंदाज आहे. चोरीची बाईक वापरून हे स्फोट घडवून आणल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला आहे. अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या दगडूशेठ गणपती मंदिराजवळ स्फोट झाल्यानं स्फोटांचं गांभीर्य वाढलंय.

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात