09 मे : शरद पवार हे साखरे सारखे आहेत. ते कुठल्याही आघाडी किंवा युतीच्या दुधामध्ये सहज मिसळून जातील असं मत भाजपच्या फायरब्रँड नेत्या उमा भारती यांनी व्यक्त केलंय. एकाप्रकारे निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एनडीएबरोबर येऊ शकतात असे संकेत त्यांनी दिले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी त्या आज नागपुरात आल्या होत्या यावेळी भारती माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या. तर दुसरीकडे देशामध्ये नरेंद्र मोदींची कोणतीही लाट नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय.
तसंच निवडणुकीत काँग्रेसबरोबरच राहणार, कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मोदी आणि पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं लोकसभेचा निकाल काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यातच उमा भारती यांनी नव्याने संकेत दिले आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++