08 जून : राज्यातली विधानसभा निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामूहिक नेतृत्व आहे त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर लोकशाही मार्गाने नेतृत्व निवडलं जाईल असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचवेळी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत मला आणण्याची गरज नाही हेही पावरांनी कार्यकर्त्यांना निक्षून सांगितल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा १५ वा वर्धापनदिन सोहळा मुंबईत पार पडला. या मेळाव्यात शरद पवारांनी स्वपक्षीय नेत्यांना फटकारतानाच मुख्यमंत्रीपदाविषयीची भूमिकाही स्पष्ट केली. विधानसभेविषयी शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराविषयी सुरु असलेली चर्चा पुरे झाली. राष्ट्रवादी काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखालीच निवडणुकीला सामोरे जाणार. जनतेने पुन्हा संधी दिल्यास निर्वाचीत आमदारांपैकी एकाची नेता म्हणून निवड करु असे पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व नेत्यांनी सुरु केली आहे.
या मेळाणव्यात काँग्रेस आणि आघाडीचा फारसा उल्लेख न करता शरद पवारांनी राष्ट्रवादीने राज्य आणि केंद्रीय मंत्रीमंडळात भरीव कामगिरी केल्याचा दावा केला. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे जे झालं ते झालं फण राज्यातली परिस्थिती राष्ट्रवादीला अनुकुल आहे असं सांगतांना मराठा आणि मुस्लिम सामाजाला आरक्षण तसंच धनगर आणि लिगायत समाजाला आरक्षणाच्या सवलती शिवाय सर्वांना वीज आणि एलबीटीचा फेरविचार असे महत्तावचे निर्णय राज्य सरकारने तातडीने घेतले पाहिजेत अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली.
काही लोक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन लोकांच्या श्रद्धेच्या व्यक्तिमत्वाविषयी वापर करुन समाजात वैर निर्माण करतात ज्यात वैर वाढत असा समाज प्रगती करु शकत नाही. दिल्लीत सत्ता परिवर्त झाल्यानंतर काही समाज घटक आता देश आपल्या हातात आल्याच्या आविर्भावात आहेत. एनसीपीचे कार्यकर्ते समाजातल्या कोणत्याही लहान घटकावर कोणताही अन्याय आणि अत्याचार होऊ देणार नाही. सामाजिक ऐक्याचा भंग होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. डॉ.आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा विचार समाजासमोर राहील याची काळजी घेण्याची गरज आहे. असं ही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत अपयश आलं तरी आत्मविश्वास गमावू नका , नव्या जोमानं कामाला लागा. स्वत:चा विकास न करता राज्याचा आणि माणुसकीचा विकास करा. केवळ विकास करून लोकांचं समाधान होत नाही तर विकासाचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोचतोय ना यासाठी लोकांशी सुसंवाद ठेवा, असं पवार म्हणाले.
नेता आणि कार्यकर्ता तसेच जनतेमधील अंतर वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसला आहे.आता हे अंतर कमी करुन कार्यकर्ता व जनता दोघांशी सुसंवाद साधा. जनतेशी सुसंवाद साधून विकास करा. आता चुक दुरुस्त करा अन्यता विधानसभेत जनताच आपल्याला दुरुस्त करेल असा इशाराही त्यांनी पक्षातील नेत्यांना दिला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++