06 जानेवारी : एरवी अभ्यासपूर्ण बोलणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचा काल तोल ढळला, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी मोदींवर केलेल्या टीकेला तुम्ही काय उत्तर द्याल, असं विचारण्यात आल्यावर फडणवीस म्हणाले की एखादा संपादक जेव्हा वेडा होतो, तेव्हा त्याच्याकडे लक्ष न दिलेलंच बरं, असं म्हणाले. विशेष म्हणेज आज 6 जानेवारी, आज पत्रकार दिन आहे, त्याच्या आदल्या दिवशीच फडणवीसांनी एका ज्येष्ठ पत्रकाराविषयी असे असभ्य उद्गार काढले आहेत.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिलं जातं पण पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येलाच एका नेत्याने ज्येष्ठ पत्रकारांवर असभ्य भाषेत टीका केली आहे. सासवडमध्ये भरलेल्या 87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये काल झालेल्या परिसंवादात केतकर यांनी मोदी आणि फॅसिस्ट शक्तींवर टीका केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकारांवर होणार्या टीकेचा नीचांक गाठला.