**
14 ऑक्टोबर :**दादरी हत्याकांड आणि गुलाम अली प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मौन सोडलं. दोन्ही घटना दुदैर्वी, पण केंद्राशी संबंध नसल्यांचंही त्यांनी स्पष्ट केलं. या दोन्ही घटना राज्य सरकारच्या अधिकार कक्षेतल्या आहे. भाजप अशा घटनांना कधीच पाठिंबा देत नाही असंही मोदींनी स्पष्ट केलं. एका बंगाली वृत्तपत्राला मुलाखत देताना पंतप्रधानांनी ही प्रतिक्रिया दिलीय. बंगाली दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी दादरी प्रकरणावर भाष्य केलं. दादरी प्रकरण दुदैर्वी आहे. गुलाम अलींच्या कार्यक्रमाला शिवसेनेनं केलेला विरोध ही दुख:द घटना आहे. या अगोदरही असे वाद झाले होते. भाजपने प्रत्येक वेळा अशा घटनांना विरोध केलाय. आज या घटनेमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. यावर चर्चा केली तरच यावर तोडगा निघू शकतो. भाजप कधीच अशा घटनांना समर्थन करत नाही असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं. तसंच अशा घटनांच्या आडून विरोधक राजकारण करत आहेत, असाही पलटवार त्यांनी यावेळी केला. अशा घटना म्हणजे राजकारणाच्या ध्रुवीकरणाचा परिणाम असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलीय. तर मोदी मनापासून बोलत नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++