जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / ठाणे विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या रवींद्र फाटकांचा विजय

ठाणे विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या रवींद्र फाटकांचा विजय

ठाणे विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या रवींद्र फाटकांचा विजय

ठाणे - 06 जून : शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या ठाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत अखेर रवींद्र फाटक यांनी बाजी मारली आहे. मतमोजणीच्या सुरूवातीपासूनच सेनेच्या रवींद्र फाटक यांनी आघाडी घेतली होती. या संपूर्ण लढतीत फाटक यांचं पारडं जड असल्याचं मानलं जात होतं. अटीतटीच्या लढतीत शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांचा 151 मतांनी पराभव केला आहे. रवींद्र फाटक यांना 601 तर, डावखरे यांना 450 मतं मिळाली.

  • -MIN READ
  • Last Updated :
    Ravindra-Phatak212

    मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच रवींद्र फाटक यांनी डावखरे यांच्यावर आघाडी घेतली होती. ती अखेरपर्यंत कायम राहिली. दोघांचं भवितव्य अपक्षांच्या 72 मतांवर अवलंबून होतं. अपक्षांनी आपलं वजन फाटक यांच्या पारड्यात टाकल्याचं निकालातून दिसून आलं आहे. महायुतीला त्यांच्या संख्याबळापेक्षा 90 मतं अधिक मिळाल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. वसंत डावखरे यांनी पराभव मान्य केला असून विजयी उमेदवार फाटक यांचं अभिनंदन केलं आहे.

    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात