ठाणे - 17 जानेवारी : प्रसिध्द पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींचा फेब्रुवारी महिन्यात ठाण्यात गझल गायनाचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानतर्फे आयोजित ठाणे महोत्वसात गुलाम अलींचा कार्यक्रम होईल. गुलाम अलींनी या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून दिली. 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान ठाण्यात हा महोत्वसात होणार आहे.
Welcome ...a evening with GAzAl KiNg #GhulamAli pic.twitter.com/nCvgnUdsW0
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 17, 2016
दोनच दिवसांपूर्वी केरळमध्ये गुलाम अली यांचा विशेष सत्कार झाला होता, त्या कार्यक्रमावेळीसुध्दा शिवसेना कार्यकत्यांनी निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तो प्रयत्न यशस्वी होऊ दिला नव्हता.
दरम्यान, पाकिस्तानी कलाकरांचे महाराष्ट्रात कार्यक्रम आयोजित करण्यास शिवसेनेचा प्रखर विरोध असून, मागच्यावर्षी शिवसेनेच्या विरोधामुळे गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द करावा लागला होता. त्यानंतर उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये गुलाम अलींची मैफल झाली, पण आता ठाणे फेस्टीव्हलमध्ये ते येणार म्हटल्यावर पुन्हा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत Follow @ibnlokmattv
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++