16 ऑक्टोबर : कोल्हापुरात पुन्हा एकदा टोल विरोधात आंदोलन पेटले आहे. उद्या टोल विरोधी कृती समिती कोल्हापूर बंदची हाक दिलीय. टोल विरोधात आज समितीनं गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या घरावर मोर्चा काढला. मात्र या मोर्चाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शेकपचे ज्येष्ठ नेते प्रा. एन डी पाटील आणि कम्युनिष्ट नेते गोविंद पानसरे यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी सतेज पाटील यांनी येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी टोल विरोधी कृती समितीची चर्चा घडवून आणू असं आश्वासन दिलंय. पण टोल विरोधी कृती समिती आपल्या भुमिकेवर ठाम आहे आणि उद्या कोल्हापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







