25 जून : उत्तराखंडमध्ये भारतीय लष्कर आणि हवाई दलाचे जवान जीवावर उदार होऊन बचावकार्य करत आहेत. पण, बचावकार्य करणार्या हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर आज कोसळलं.
हेलिकॉप्टरमध्ये एकूण 19 जण होते. त्यातल्या 8 जणांचा मृत्यू झालाय. इतरांचा शोध सध्या सुरू आहे. हवाई दलाचं MI-17 हे हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळ कोसळलं. त्यात हवाई दल, इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच आयटीबीपी (ITBP) आणि नॅशल डिझास्टर रेस्क्यू फोर्स म्हणजेच एनडीआरए (NDRF) चे जवान होते.
जाहिरात
गौचरहून या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं आणि ते गौरीकुंडच्या दिशेनं जात होतं. ते का कोसळलं याचं कारण अजून समजलेलं नाहीय. पण ते दाट धुक्यांमुळे कोसळलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय. हा अपघात झाला असला तरी या भागातलं बचावकार्य सुरूच राहील असं हवाई दलानं स्पष्ट केलंय. दरम्यान, अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.