जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / कोल्हापूरात पुन्हा 'टोल'वसुली

कोल्हापूरात पुन्हा 'टोल'वसुली

कोल्हापूरात पुन्हा 'टोल'वसुली

05 फेब्रुवारी : कोल्हापुरमध्ये आजपासून पुन्हा टोल वसुली सुरु झाली आहे. आयआरबी कंमनीच्या आधिकार्‍यांनी आज (बुधवारी) सकाळी कोल्हापुर मधल्या 9 पैकी 3 टोलनाक्यांवर कडक पोलीस बंदोबस्तात टोलवसुली करण्यात आली आहे. या परिसरात पोलिसांनी कलम 144 लागू केला आहे. आयआरबीने काल (मंगळवारी) महापालिकेला त्याबाबत पत्रं पाठवलं होतं. शहरातील एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाचे पैसे देण्याची जबाबदारी कोल्हापुर महापालिका घेईल, त्यामुळे टोलवसुली बंद झाल्याची घोषणा कामगार मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केल्यानंतरही टोलवसुली सुरूच राहिल्याने शहरातील आयआरबीचे टोलनाके पेटविण्यात आले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

    kolhapur toll update 05 फेब्रुवारी :  कोल्हापुरमध्ये आजपासून पुन्हा टोल वसुली सुरु झाली आहे. आयआरबी कंमनीच्या आधिकार्‍यांनी आज (बुधवारी) सकाळी कोल्हापुर मधल्या 9 पैकी 3 टोलनाक्यांवर कडक पोलीस बंदोबस्तात टोलवसुली करण्यात आली आहे. या परिसरात पोलिसांनी कलम 144 लागू केला आहे. आयआरबीने काल (मंगळवारी) महापालिकेला त्याबाबत पत्रं पाठवलं होतं.

    शहरातील एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाचे पैसे देण्याची जबाबदारी कोल्हापुर महापालिका घेईल, त्यामुळे टोलवसुली बंद झाल्याची घोषणा कामगार मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केल्यानंतरही टोलवसुली सुरूच राहिल्याने शहरातील आयआरबीचे टोलनाके पेटविण्यात आले होते.

    जाहिरात

    मात्र हा प्रकार ताजा असतानाच आयआरबीने मंगळवारी पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेला पत्र पाठवून टोलवसुलीकरीता पोलीस बंदोबस्त देण्याची विनंती केली. त्यानंतर बुधवार सकाळपासून टोलवसुलीस सुरूवात झाली आहे.

    राज्यभर आंदोलन करू-अण्णा

    राज्यातला टोल म्हणजे वाटमारी आहे आणि अशा परिस्थितीत जनतेने कायदा हातात घेतला, तर त्यात चूक सरकारची आहे, अशी रोखठोक भूमिका अण्णांनी मांडली आहे.‘टोलविषयक नवं धोरण आणा नाही तर राज्यभर आंदोलन करू असं आव्हान अण्णा हजारे यांनी राज्या सरकारला दिले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात