जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / कोल्हापुरात टोलविरोधात महापदयात्रा

कोल्हापुरात टोलविरोधात महापदयात्रा

कोल्हापुरात टोलविरोधात महापदयात्रा

26 ऑक्टोबर : कोल्हापुरकरांनी आज पुन्हा एकदा टोलविरोधात रणशिंग फुंकलंय. आज शहरातल्या मॉर्निंग वॉक करणार्‍या नागरिकांनी टोलविरोधात महापदयात्रा काढून टोलला विरोध दर्शवला. शिवाजी विद्यापीठापासून ते ताराराणींच्या पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार सुजित मिणचेकर यांनी या पदयात्रेचं आयोजन केलं होतं. या पदयात्रेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. महिलांचाही यात मोठा सहभाग होता. त्यामुळे आज कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा ‘देणार नाही टोल आम्ही देणार नाही ’ ही घोषणा पहाटेच ऐकायला मिळाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

    kolhapur toll 26 ऑक्टोबर : कोल्हापुरकरांनी आज पुन्हा एकदा टोलविरोधात रणशिंग फुंकलंय. आज शहरातल्या मॉर्निंग वॉक करणार्‍या नागरिकांनी टोलविरोधात महापदयात्रा काढून टोलला विरोध दर्शवला. शिवाजी विद्यापीठापासून ते ताराराणींच्या पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार सुजित मिणचेकर यांनी या पदयात्रेचं आयोजन केलं होतं. या पदयात्रेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. महिलांचाही यात मोठा सहभाग होता. त्यामुळे आज कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा ‘देणार नाही टोल आम्ही देणार नाही ’ ही घोषणा पहाटेच ऐकायला मिळाली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: kolhapur , tol , toll
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात