जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / कॅम्पा कोलात लतादीदींच्या फ्लॅटचं वीज,पाण्याचं कनेक्शन तोडलं

कॅम्पा कोलात लतादीदींच्या फ्लॅटचं वीज,पाण्याचं कनेक्शन तोडलं

कॅम्पा कोलात लतादीदींच्या फ्लॅटचं वीज,पाण्याचं कनेक्शन तोडलं

24 जून : मुंबईतील वादग्रस्त कॅम्पाकोला इमारतीवर सध्या कारवाई सुरू आहे पण या इमारतीत गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचाही अनधिकृत फ्लॅट असल्याचं समोरं आलं होतं. लतादीदींच्या या अनधिकृत फ्लॅटवर पालिका अधिकार्‍यांनी कारवाई केली आहे. या फ्लॅटवरही या फ्लॅटची वीज आणि गॅस कनेक्शन तोडण्यात आलंय. लतादीदींनी काही दिवसांपूर्वी कॅम्पा कोलावासीयांची बाजू घेतली होती पण त्यांचा फ्लॅट असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे लतादीदींची सूर मावळला होता. जाहिरात दरम्यान, आज दुसर्‍यादिवशी पालिकेनं कारवाईचा वेग वाढवलाय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    3lata mangeshkar flat in campa cola 24 जून : मुंबईतील वादग्रस्त कॅम्पाकोला इमारतीवर सध्या कारवाई सुरू आहे पण या इमारतीत गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचाही अनधिकृत फ्लॅट असल्याचं समोरं आलं होतं. लतादीदींच्या या अनधिकृत फ्लॅटवर पालिका अधिकार्‍यांनी कारवाई केली आहे. या फ्लॅटवरही या फ्लॅटची वीज आणि गॅस कनेक्शन तोडण्यात आलंय. लतादीदींनी काही दिवसांपूर्वी कॅम्पा कोलावासीयांची बाजू घेतली होती पण त्यांचा फ्लॅट असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे लतादीदींची सूर मावळला होता.

    जाहिरात

    दरम्यान, आज दुसर्‍यादिवशी पालिकेनं कारवाईचा वेग वाढवलाय.ज्या फ्लॅट्सचं गॅस आणि वीज-पाण्याचं कनेक्शन तोडलंय, तिथले काही रहिवासी सामान बांधून निघून बाहेर पडले. आज सकाळी 11च्या दरम्यान, पुन्हा कारवाईला सुरुवात झाली. सध्या लगेच बांधकाम पाडलं जाणार नाही. पण बाकीच्या सेवा तोडण्याचं काम सध्या सुरू आहे. या इमारतीतल्या अनधिकृत मजल्यांवरचा वीज, गॅस आणि पाणी पुरवठा काल कापण्यात आला.

    काल 55 घरांचं वीज कनेक्शन, 15 घरांच गॅस कनेक्शन, 3 घरांच पाणी कनेक्शन तोडण्यात आलं होतं. या कारवाईत एकूण 12 टीम्स सामील होत्या. यात पालिका कार्यालयातल्या वेगवेगळ्या विभागातल्या प्रत्येकी चार टीम्स होत्या. एकूण 90 फ्लॅट्सचा वीज, गॅस आणि पाणीपुरवठा तोडण्यात आला. सध्या रहिवाशी या कारवाईला अजिबात विरोध करत नाहीयेत. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर कालच कॅम्पा कोलावासीयांनी आंदोलन मागे घेतलं होतं. दरम्यान, कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी रहिवाशांवर नियमाप्रमाणे कारवाई सुरू राहील.

    जाहिरात

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: BMC , mumbai , varli
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात