14 सप्टेंबर : आम्ही आमचा उमेदवार जाहीर केलाय, हा आमच्या पक्षाचा आणि लोकभावनेचा निर्णय होता. काँग्रेसला जर एवढेच वाटत असेल तर त्यांनी आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, असं आवाहन भाजपचे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी दिलंय. तसंच घरातील मोठ्या व्यक्तींने आपल्या मुलाला काही बोललं म्हणून घरात फाटाफूट होत नाही असं सांगत त्यांनी अडवाणी नाराज नसल्याचं स्पष्ट केलंय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची घोषणा झाल्यानंतर पक्षात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी एकाकी पडल्याचं चित्र आहे. पण पक्षातल्या मतभेदांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करताना दिसतायत. अडवाणी नाराज नाहीत, असा दावा भाजपचे नेते करत आहे. 25 सप्टेंबरला भोपाळमध्ये भाजपचा क ार्यक्रम आहे. त्यात नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलंय. तर काँग्रेसची ही परंपरा नाही. आम्ही निवडणुकीच्या अगोदर पंतप्रधानपदाचे उमेदवार कधीच जाहीर करत नाही. आमचा संविधानावर विश्वास आहे. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी आणि काँग्रेस हायकंमाडच आमचा उमेदवार ठरवेल आणि आमचाच उमेदवार पंतप्रधान होईल असं उत्तर काँग्रेसचे नेते रशीद अल्वींनी दिलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.