16 जून : उत्तराखंडमध्ये मागच्या वर्षी ढगफुटीमुळे झालेल्या भीषण दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण. केदारनाथ मंदिर आणि परिसराला याचा सगळ्यात मोठा फटका बसला होता. या दुर्घटनेत जवळपास 17,000 भाविकांचे बळी गेलेत तर अनेक जण बेपत्ता होते.
एक वर्ष उलटूनही केदारनाथ परिसरात पुनर्बांधणीचं बहुतांश काम बाकीच आहे. अजूनही रस्तेबांधणीचं काम अपूर्ण असल्याने अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. उत्तराखंडच्या प्रलयातल्या बेपत्ता झालेल्या हजारोंपैकी आपले जीवलग जिवंत असतील अशी आशा अनेक लोक आजही बाळगून आहेत, असं असूनही प्रशासनाचं मात्र दुर्लक्षच आहे. केदारनाथ मंदिर परिसराची स्थिती आणि तिथल्या अडचणी यात नरेंद्र मोदींचं सरकार लक्ष घालेल आणि बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करेल असं आश्वासन भाजप पदाधिकारी अश्विन चौबे यांनी दिलं आहे. प्रलयाचं एक वर्ष… उत्तराखंडच्या जलप्रलयाला आज एक वर्ष पूर्ण होतंय. पण ज्यांचे कुटुंबीय या प्रलयानं गिळले त्यांच्या डोळ्यांतलं पाणी अजूनही आटलेलं नाही. वसईमधले केदार नाईक आजही आपल्या आई-बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले आहेत. गेल्यावर्षी त्यांनी मोठ्या आनंदानं आपल्या आई-बाबांना चारधाम यात्रेसाठी पाठवलं होतं. मात्र सुरतच्या एका ट्रॅव्हल कंपनीसोबत गेलेले रमेश नाईक आणि शर्मिला नाईक हे प्रलयाच्या कचाट्यात सापडले. प्रलयानंतर केदार नाईक यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन आई- बाबांचा शोध घेतला होता मात्र काहीच हाती लागलं नाही. भारतीय सेनेनं शोधमोहीम थांबवल्यानंतर केदार जड अंत:करणानं परत आले. केदार नाईक यांनी प्रथेप्रमाणे आई-वडिलांचं श्राद्धही घातलं, पण काहीतरी चमत्कार होईल आणि आई- बाबा परत येतील ही आशा त्यांनी सोडलेली नाही. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++