02 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरमेहेर प्रकरणात भाजप सरकारवर टीका केलीय आणि गुरमेहरचं समर्थन केलंय. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचे विचार चुकीचे आहेत, हे सगळं प्रकरण मिटवण्याऐवजी सरकार या वादात भर घालतंय, अशी टीका शरद पवारांनी केली.
दिल्ली विद्यापीठातल्या हिंसक आंदोलनानंतर गुरमेहर कौरने अभाविचा निषेध करणारं एक ट्विट केलं होतं. त्यानंतर गुरमेहरविरोधात सोशल मीडियावर मोहीमच सुरू झाली. गुरुमेहर ही देशद्रोही आहे, अशी टीका तिच्यावर झाली. एवढंच नाही तर गुरमेहरला बलात्काराच्या धमक्याही आल्या.
दिल्ली विद्यापीठात जे घडतंय त्याविरोधात सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय. दिल्ली विद्यापीठात एक प्रकारे दशतवादाला खतपणी घातलं जातंय, असं म्हणत शरद पवार यांनी या प्रकाराचा निषेध केलाय.
गुरमेहर कौर प्रकरणावरून देशभरात पुन्हा एकदा राष्ट्रवादाबद्दल चर्चा सुरू झालीय. राष्ट्रवादावर चर्चा करायची असेल तर आम्ही या चर्चेत सहभागी होऊ, असं अरुण जेटली यांनी म्हटलंय. राष्ट्रवाद हा वाईट शब्द आहे, असा प्रचार केला जातोय. पण यात वाईट काहीही नाही, असंही ते म्हणाले. देशद्रोही आणि देशभक्त ही चर्चा आम्ही सुरू केलेली नाही, याचीही आठवण अरुण जेटलींनी करून दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.