मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सतीश शेट्टी हत्याप्रकरणाचा तपास नव्याने सुरू, 21 ठिकाणी सीबीआयचे छापे

सतीश शेट्टी हत्याप्रकरणाचा तपास नव्याने सुरू, 21 ठिकाणी सीबीआयचे छापे

satish shetty murder case05 जानेवारी : आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने पुन्हा नव्यानं सुरू केला. याप्रकरणी आता सीबीआयने आयआरबीच्या कार्यालयांसह मुंबई, पुणे, लोणावळ्यामध्ये 21 ठिकाणी छापे टाकले आहेत. सतीश शेट्टी यांच्या हत्येशी संबंधित संशयितांच्या कार्यलायावर छापे टाकण्यात आले आहेत.

पुणे तळेगाव दाभाडे येथील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणी सीबीआयने मागच्या वर्षी क्लोजर रिपोर्ट सादर करुन हत्या प्रकरणाचा तपास थांबवला होता. दरम्यानच्या काळात मयत सतीश शेट्टी यांनी सुरुवातीच्या काळात जमीन घोटाळा प्रकऱणात तपास करण्याची परवानगी मागितली होती. त्याबाबत कोर्टाने परवानगी दिली होती. त्यानुसार ही कारवाई सुरू आहे. आयआरबीचे विरेंद्र म्हैसकर यांचा सतीश शेट्टी हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय यापूर्वी घेतला गेला होता. आता पुन्हा एकदा सीबीआयने तपासाला सुरुवात केल्यामुळे या प्रकरणाला नवं वळणं मिळालंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Pune, RTI, सीबीआय