मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सतीश शेट्टींचे मारेकरी सापडतच नाही, सीबीआयने टेकले हात

सतीश शेट्टींचे मारेकरी सापडतच नाही, सीबीआयने टेकले हात

satish shetty murder case11 ऑगस्ट :आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणाचा सीबीआयने आज (सोमवारी) क्लोजर रिपोर्ट सादर केला. या हत्याप्रकरणातील आरोपी सापडत नसल्याचा धक्कादायक दावा सीबीआयनं केला आहे.

4 वर्षांपूर्वी 13 जानेवारी 2010 ला सतीश शेट्टी यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी तब्बल एक हजार संशयितांची चौकशी आणि 35 संशयितांची नार्को चाचणी करण्यात आली होती. देशातील अनेक राज्यात आणि देशाबाहेर जाउनही सीबीआयने या हत्येचा तपास करत तब्बल 10,000 पेक्षा जास्त पानांचं आरोपपत्रही तयार केलं होतं.

धक्कादायक बाब म्हणजे शेट्टी यांच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याचा दावा करत पुणे ग्रामीण पोलिसांनी बंद केलेल्या एका प्रकाणाचा तपासाचा पुर्नतपास करण्यासाठीची परवानगी ही घेतेली होती.

मग नेमक आठच दिवसात असं काय घडल की, सीबीआयने आज अशा पद्धतीने क्लोजर रिपोर्ट सादर केला आणि न्यायालयाकडून पुर्नतपास करण्यासाठी परवानगी घेतलेल्या तपासाच काय होणार हे या प्रश्नाची उलट सुलट चर्चा सध्या नागरीकांमध्ये सुरू असून यामुळे सीबीआयच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अण्णांनी व्यक्त केली नाराज

सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या क्लोजर रिपोर्टमुळे सीबीआयची विश्वासार्हता कमी होईल आणि अपराध करणार्‍या लोकांचे मनोधैर्य वाढेल असं मत अण्णांनी व्यक्त केलंय. शिवाय ज्या अधिकार्‍यानं हा क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय त्याची चौकशी करावी अशी मागणी करणारं पत्र पंतप्रधानांना पाठवणार असल्याचं अण्णांनी सांगितलं.

घटनाक्रम

- नोव्हेंबर 2009 : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेसाठी जमीन संपादनात झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी सतीश शेट्टींनी दाखल केली तक्रार

- 13 जानेवारी 2010 : माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची हत्या

- मार्च 2010 : पहिल्या आठवड्यात ग्रामीण पोलिसांकडून पाच आरोपींना अटक

- 25 मार्च 2011 : प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सुपूर्द

- हत्येप्रकरणी सीबीआयने केली 900 लोकांची चौकशी

- 400 संशयितांचा जबाब नोंदविला

- पुणे ग्रामीण पोलीस दलातले अधिकारी, कर्मचारी, महसूल विभागातले कर्मचारी आणि आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह एकूण 30 व्यक्तींची पॉलीग्राफ टेस्ट

- मार्च 2012 : पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी जामिनावर मुक्त

- 13 ऑगस्ट 2013 : हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्यात आल्याचं सांगत ग्रामीण पोलिसांनी दाखल केलेल्या सी-समरी रिपोर्टचा फेरतपासासाठी सीबीआयने हायकोर्टात केली याचिका

- वर्षभरानंतर सी-समरीच्या तपासाची कोर्टाकडून परवानगी

- परवानगी मिळाल्यानंतर तपास न करताच केवळ 3 दिवसातच ह्या सर्व प्रकरणाचा तपास संपल्याचं सांगत

11 ऑगस्टला सीबीआयनं सादर केला क्लोजर रिपोर्ट

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Pune, RTI, सीबीआय