18 फेब्रुवारी : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणार अभिनेता संजय दत्तला आणखी 30 दिवसांची सुट्टी देण्यात आलीय. संजय दत्तच्या सुट्टीमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
पत्नी मान्यताच्या आजारपणामुळे संजय दत्त सध्या जेलबाहेर आहे. त्याने तिसर्यांदा पॅरोलसाठी अर्ज केला होता, आणि त्याचा हा अर्ज मान्य करण्यात आला असून संजय दत्तला आणखी 30 दिवसांची वाढीव सुट्टी मंजूर झाली आहे. आता 21 मार्चपर्यंत संजय दत्त जेलबाहेरचं असणार आहे.
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्यापैकी अठरा महिन्याची शिक्षा संजयने अगोदर भोगली आहे. उर्वरीत शिक्षा भोगण्यासाठी संजयची रवानगी पुण्यातील येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आलीय पण या शिक्षेत, संजय दत्तने 8 महिन्यांच्या तुरुंगवासात त्याला 4 महिन्यांची सुट्टीवरचं आहे. सुट्टी बहाद्दर संजूबाबा - 21 मे 2013 : संजय दत्त येरवड्यात - 1 ऑक्टोबर 2013 : 14 दिवसांची रजा (फर्लो) - 14 ऑक्टोबर 2013 : फर्लोमध्ये 14 दिवसांची वाढ - 21 डिसेंबर 2013 : 1 महिन्याची सुट्टी - 20 जानेवारी 2014 : महिनाभराची वाढीव सुट्टी - 18 फेब्रुवारी 2014 : पॅरोलमध्ये 30 दिवसांची वाढ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune jail, Pune yervada, Sanjay dutt, Sanjay dutt arrest, Sanjay dutt in jail, Sanjay dutt in jail 2013, पॅरोल, येरवडा जेल, संजय दत्त