28 मार्च : शक्ती मिलमधील फोटोजर्नलिस्टवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाची आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. यावेळी आरोपींच्या वकिलानी हायकोर्टाच्या आदेशाची प्रत न मिळाल्याने बाजू मांडण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे सेशन कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 1 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.
आरोपींना जास्तीतजास्त शिक्षा व्हावी यासाठी 376 इ कलम लावण्याची मागणी सरकारी वकिल उज्वल निकम यांनी केली आहे. त्यावर आरोपींच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर हायकोर्टानं हे प्रकरण पुन्हा सेशन कोर्टात पाठवल्याचं सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.