04 एप्रिल : देशाच्या राजधानी दिल्लीनंतर राज्याच्या राजधानी मुंबईला हादरावून सोडणार्या शक्ती मिल गँगरेप प्रकरणी अखेर तीन नराधमांना फासावर लटकवले जाणार असून एकाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहेत.
शक्ती मिलमध्ये फोटोजर्नलिस्ट तरूणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी तीन आरोपींना सेशन्स कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलीय. सेशन्स कोर्टाने कासिम बंगाली, मोहम्मद सलीम अन्सारी आणि विजय जाधव या तिघांना फाशीची शिक्षा सुनावलीय. तर सिराज खान या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय.
कासीम बंगाली, सलीम अन्सारी, विजय जाधव यांना कलम 376 ई अंतर्गत कोर्टानं गुरूवारी दोषी ठरवलं होतं. या कलमानुसार शिक्षा सुनावण्याची देशातली ही पहिलीच घटना आहे. या तिन्ही आरोपींना यापूर्वी शक्ती मिल परिसरातच एका टेलिफोन ऑपरेटरवर तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातही दोषी ठरवण्यात आलंय. आणि त्यांना जन्मठेपही सुनावण्यात आलीय.
काय आहे कलम 376 ई ?
- दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर आयपीसीमध्ये सुधारणा करण्यात आली - मार्च 2013 मध्ये 376 ई कलमाचा अंतर्भाव करण्यात आला - बलात्काराच्या गुन्ह्यातल्या आरोपीने पुन्हा तोच गुन्हा केला असेल तर त्याला 376 ई कलमानुसार दोषी ठरवण्यात येतं - 376 ई कलमानुसार मरेपर्यंत जन्मठेप ते फाशीची शिक्षा होऊ शकते - 376 ई कलमानुसार सुरू असेलला हा पहिला खटला आहे. त्यामुळे तो ऐतिहासिक आहे (सविस्तर बातमी लवकरच)