अनुश्री पवार, मुंबई
24 डिसेंबर : अलीकडेच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दोन दिवसीय भारत दौरा केला. या दौर्यादरम्यान पिचाईंनी अनेक नविन प्रोजेक्ट्स भारतात आणू अशी घोषणा केली. त्यातलाच भारतासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणारा प्रोजेक्ट म्हणजे प्रोजेक्ट लून...पण नक्की काय आहे हा प्रोजेक्ट लून हे सांगणारा पाहा रिपोर्ट...
प्रोजेक्ट लून...बलून्सच्या माध्यमातून जगाला कनेक्ट करणारी ही नवी टेक्नॉलॉजी....काही वर्षांपूर्वी या टेक्नोलॉजीचा शोध लावलाय टेक्नो जायंट गुगल कंपनीने. या प्रोजेक्टची पहिली चाचणी 2013 साली 30 बलून्ससह न्यूझीलंड देशात करण्यात आली. आणि तिथल्या 50 रहिवाश्यांनी स्पेशल ऍन्टिनाझ्च्या मदतीने या हवाई नेटवर्कची तपासणी देखिल केली. अशी खरी सुरुवात झाली प्रोजेक्ट लूनची.
काय आहे हा प्रोजेक्ट लून ?
समुद्रसपाटीपासून 20 किलोमीटरच्या उंचीवर हवेतील बलून्स सोडण्यात येतात
हेलियम वायूने भरलेले सुपरप्रेशर बलून्स हवेत वायरलेस नेटवर्क तयार करतात
स्पेशल इंटरनेट अँटिनाच्या मदतीने या बलून्सचे रेडिएशन्स जमिनीवर मिळतात
हे बलून्स स्ट्रेटोस्पिअर या हवेच्या उंच लेयरमध्ये असतात
वातावरणातील कोणत्याही बदलांचा बलून्सवर परिणाम होत नाही
एका बलूनचं आयुष्य जवळपास 100 दिवसांचं असतं
याबद्दल सुंदर पिचाई म्हणतात,"आम्ही प्रोजेक्ट लूनवर कार्यरत आहोत. प्रोजेक्ट लून या आमच्या उपक्रमात बलून्सना आकाशात उंच सोडण्यात येतं जेणेकरुन इंटरनेटची सुविधा दुर्गम भागातही पोहोचू शकेल. आमच्या मते ती पोहोचण्याची जास्त आवश्यकता आहे. आणि भारतात ही सुविधा आणण्यासाठी आम्ही प्रयत्न ही करत आहोत."
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या टेक्नोलॉजीचा आपल्याला कसा आणि काय उपयोग होईल ? या प्रोजेक्टचा फायदा फक्त नेटकरी मंडळींनाच नाही तर इंटरनेट काय आहे ज्या लोकांना माहित नाही त्यांच्यापर्यंतही इंटरनेट सुविधा पोहोचवण्याचं काम लून प्रोजेक्ट करणार आहे. कारण, लूनच्या मदतीने प्रत्येक खेड्यातील आणि मोबाईल नेटवर्क नसणार्या भागांमध्येही इंटरनेट सुविधा पोहोचण्यास यामुळे मदत होणार आहे. आणि मुख्य म्हणजे ही इंटरनेट सुविधा 4 जी च्या स्पीडने चालणार आहे. मग आहे की नाही हा प्रोजेक्ट उपयुक्त...
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google