01 मे : राज्यात वाळू माफियांचा उच्छाद सुरूच आहेत. औरंगाबादमध्ये वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारावर पिस्तुल रोखण्यात आलं. तहसीलदार नारायण उबाळे हे वैजापूरचे तहसीलदार आहेत. बेकायदा वाळू माफियांवर कारवाईसाठी ते गेले होते. तेव्हा त्यांच्यावरच पिस्तुल रोखण्याचा प्रकार घडला. तर दुसरीकडे सिंधुदुर्गमधील वेंगुर्ल्यातील अणसूर पाल खाडीतून बेसुमार वाळू उपसा होतोय. त्यामुळे किनार्यालगतच्या वस्तीला धोका निर्माण झालाय. याविरोधात गावकर्यांनी वेंगुर्ले तहसीलवर अनेक वेळा आंदोलनंही केली. पण महसूल विभागाकडून वाळू व्यावसायिकांना पाठीशी घातलं जात असल्याची तक्रार गावकर्यांनी केलीय. इतकंच नाही तर हा वाळू उपसा पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोपही गावकर्यांनी केलाय. वाळू उपशाचा परवाना कायदेशीर आहे की बेकायदेशीर याबाबतही ठोस उत्तर महसूल विभागाकडून देण्यात आलं नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी या विरोधतलं आपलं आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++