जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / जनतेच्या विश्‍वासाचे वस्त्रहरण झाले - शिवसेना

जनतेच्या विश्‍वासाचे वस्त्रहरण झाले - शिवसेना

जनतेच्या विश्‍वासाचे वस्त्रहरण झाले - शिवसेना

18 मार्च : अविश्वास ठरावाच्यावेळी भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने, महाराष्ट्रातील 11 कोटी मराठी जनतेला ‘आपणच द्रौपदी झालो असून भरबाजारात आपलेच वस्त्रहरण झाले’ असे वाटू लागल्याची टीका शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे, असा जाहीर आरोपही शिवसेनेने केला आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याबाबतच्या अविश्वास ठरावा दरम्यान भाजपनं देशमुखांच्या विरोधात मतदान केलं, यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात आज (बुधवारी) भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :
    Uddhav and fadnavis11

    शिवसेनेने आज (बुधवारी) आपल्या ‘सामना’ या मुखपत्राच्या अग्रलेखातून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीवर जोरदार टीकास्त्र सोडले आहेत. या अग्रलेखात अविश्वास ठरावाचा ‘महाभारत’ असा उल्लेख केला असून ‘भाजप’चा ‘दुर्योधन’ म्हणून उल्लेख केला आहे. भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानं महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाचंच ‘वस्त्रहरण’ झाल्याचा आरोप शिवसेनेनं ‘सामना’तून केला आहे.

    सरकारात शिवसेना-भाजपची युती असली तरी प्रत्यक्षात भाजप-राष्ट्रवादीचे शुभमंगल आंतरपाटाशिवाय झाले की काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. काँग्रेस-राष्ट्रीवादीच्या कासोटाफेडीत सत्ताधार्‍यांनी दुर्योधनाची भूमिका घेण्याची गरज नव्हती, असं अग्रलेखात म्हटलं आहे. ‘राजकारणात कोणीही कुणाचे कायमचे शत्रू किंवा मित्र नसतो हे खरेच. तसे नसते तर काका-पुतण्यांपासून महाराष्ट्राला वाचवा, असे जाहीर सभांतून सांगणार्‌या पंतप्रधान मोदींनी बारामतीत जाऊन ‘काकासाहेब आपले मार्गदर्शक आहेत’ वगैरे गौप्यस्फोट केले नसते,‘असं म्हणत शिवसेनेने मोदींवरही अग्रलेखातून निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीशी कोणतीही कसलीही युती नाही, असे सत्तास्थापनेपूर्वी बोलणारे मुख्यमंत्री फडणवीस आज राष्ट्रवादीचे चुंबन घेताना दिसतात तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला ‘आपणच द्रौपदी झालो असून भरबाजारात आपलेच वस्त्रहरण झाले’ असे वाटू लागते, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: BJP , NCP , samna
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात