08 डिसेंबर : लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रविवारी निकाल लागणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल.
यापैकी पाच राज्यांच्या झालेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्ष पाहता मिझोराम वगळता इतर चारही राज्यांमध्ये भाजपची सत्ता येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दिल्लीतल्या गेल्या पंधरा वर्षांच्या काँग्रेसच्या राजवटीला आम आदमी पार्टीमुळे सुरुंग लागलाय.
पहिल्यांदाच दिल्लीच्या निवडणुक आखाड्यात उतरलेल्या आम आदमी पार्टी दुसर्या स्थानावर येईल असा मतदानोत्तर चाचणीचा अंदाज आहे. तर काँग्रेस थेट तिसर्या क्रमांकावर जाईल असाही त्यांचा अंदाज आहे. तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप सरकार आपली सत्ता टिकवण्यात यशस्वी होईल, असाही या चाचण्यांचा अंदाज आहे. तर राजस्थान सत्ताबदल होऊन, तिथे भाजप काँग्रेसकडून सत्ता काढून घेईल, असे मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष आहेत. सर्वच मतमोजणी केंद्रांच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभेची सेमीफायनल कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
आयबीएन नेटवर्क-सीएसडीएस आणि द वीक पोस्ट पोल सर्व्हे
======================================================== दिल्ली विधानसभा निवडणूक – 2013 ======================================================== सत्ताधार्यांना पुन्हा संधी द्यावी ?
- हो – 23 %
- नाही – 70%
- माहीत नाही – 7%
======================================================== सरकारची कामगिरी समाधानकारक आहे ?
- हो – 40%
- नाही – 56%
- माहीत नाही – 4%
======================================================== मुख्यमंत्री कोण असावा ?
- अरविंद केजरीवाल – 27%
- हर्षवर्धन – 22%
- शीला दीक्षित – 15%
======================================================== पंतप्रधान कोण असावा ?
- नरेंद्र मोदी – 49%
- राहुल गांधी – 11%
- अरविंद केजरीवाल – 6%
- मनमोहन सिंग – 4%
- सोनिया गांधी – 2%
- मायावती – 1%
======================================================== मतांची टक्केवारी ——————————————————— पक्ष 2008 डिसें.2013 फरक ——————————————————— भाजप 36.3% 33% -3% AAP — 27% +27% काँग्रेस 40.3% 23% -17% बसप 14.0% 8% -6% इतर 9.4% 9% -1% ——————————————————— ======================================================== जागांचा अंदाज ——————————————————- पक्ष- ऑक्टो. 2013 डिसें.2013 ——————————————————- भाजप 22-28 32-42 AAP 19-25 13-21 काँग्रेस 19-25 9-17 इतर 0-2 1-7 —————————————————— ======================================================== निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे
- महागाई – 37%
- भ्रष्टाचार – 27%* वीज – 6%
- विकास आणि प्रशासन – 5%
- पाणी – 5%
- सुरक्षा – 3%
- रोजगार – 2%
- रस्त्यांची अवस्था – 2%
- गटारी – 2%
- आरोग्य आणि शिक्षण – 2%
======================================================== असा केला सर्व्हे
- सर्व्हेचा कालावधी – 4 आणि 5 डिसें. 2013
- मतदारसंघांची संख्या – 29
- मतदानकेंद्रांची संख्या – 126
- अपेक्षित मतदारांचा सहभाग – 2529
- प्रत्यक्ष मतदारांचा सहभाग – 2263
========================================================
छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता छत्तीसगडमध्ये एकूण 90 जागांसाठी मतदान झाले आहे. या सर्व्हेनुसार भाजप 45 ते 55 जागा मिळवून भाजप सत्ता कायम राखणार तर काँग्रेसला 32 ते 40 जागा मिळतील. मतांची टक्केवारी पाहिली तर मागील वेळा 2008 मध्ये काँग्रेसला 38.6 टक्के झालं होतं. तर यावेळी निवडणुकांची घोषणा झाली तेंव्हा ही टक्केवारी 6 टक्क्यांनी घसरली होती. मात्र नोव्हेंबरमध्ये बरोबरी साधत 38 टक्के कायम राखली. काँग्रेसच्या मतात अर्ध्या टक्क्यांनी फरक पडलाय. तर भाजपची मतांची टक्केवारी 2008 मध्ये 40.3 टक्के होती ती यावेळी 2 टक्क्याने वाढून 42 टक्के झाली आहे. जनतेनं पुन्हा एकदा रमन सरकारला पसंती दिली. =================================================== मतांची टक्केवारी ———————————————————————————– पक्ष 2008 ऑक्टो. 2013 नोव्हे. 2013 फरक ———————————————————————————– काँग्रेस 38.6% 32% 38% -1 % भाजप 40.3% 46% 42% +2% बसप 6.1% 6% 5% -1% इतर 15% 16% 15% 0 ———————————————————————— ———- =================================================== जागांचा अंदाज
- एकूण जागा – 90
- काँग्रेस – 32 – 40
- भाजप – 45 – 55
- इतर – 1-7
=================================================== विभागनिहाय स्थिती
- उत्तर छत्तीसगड (जागा-34) : काँग्रेस-भाजपमध्ये चुरशीची लढत
- मध्य छत्तीसगड (जागा-43) : भाजपची आघाडी, शहरी भागात काँग्रेसशी सामना
- दक्षिण छत्तीसगड (जागा-13) : भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत
=================================================== मुख्यमंत्री कोण व्हावा ?
- रमण सिंग – 46%
- अजित जोगी – 21%
=================================================== पंतप्रधान कोण व्हावा ?
- नरेंद्र मोदी – 30%
- राहुल गांधी – 16%
- सोनिया गांधी – 6%
- मनमोहन सिंग – 6%
- रमण सिंग – 4%
- लालकृष्ण अडवाणी – 2%
- मायावती – 2%
=================================================== मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक – 2013 =================================================== मध्यप्रदेशमध्ये भाजपचा मोठा विजय मध्यप्रदेशमध्ये आयबीएन नेटवर्क-सीएसडीएस आणि द वीकने पोस्ट पोल सर्व्हे नुसार भाजप मोठा विजय मिळवणार हे स्पष्ट झालंय. मध्यप्रदेशमध्ये एकूण 230 जागांसाठी मतदान झाले असून भाजपच्या वाट्याला तब्बल 136 ते 146 जागाचं घवघवीत यश मिळणार असं दिसतंय. तर काँग्रेसला 100 चा आकडाही पार करता येणार नाही. काँग्रेसला 67 ते 77 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर इतर पक्षांना 13 ते 21 जागा मिळतील. 48 टक्के जनतेनं भाजपला संधी द्यावी असा कौल दिलाय. त्यामुळे शिवराज सिंग चौहान विजयाची हॅट्रटिक साधणार हे जवळपास निश्चित आहे. =========================================================== मतांची टक्केवारी ————————————————————————————————— पक्ष 2008 ऑक्टो 2013 नोव्हे. 2013 फरक ————————————————————————————————– भाजप 37.6% 44% 41% +3% काँग्रेस 32.4% 33% 35% +3% बसप 9% 7% 9% 0 इतर 21% 16% 15% -6% —————————————————————————————————- =========================================================== जागांचा अंदाज
- एकूण जागा – 230
- काँग्रेस – 67-77
- भाजप – 136-146
- इतर – 13-21
=========================================================== सत्ताधार्यांना पुन्हा संधी द्यावी?
- हो – 48%
- नाही – 27%
- माहित नाही – 25%
=========================================================== मुख्यमंत्र्यांची कामगिरी
- समाधानी – 74%
- असमाधानी – 18%
- माहित नाही – 8%
=========================================================== मुख्यमंत्री कोण असावा ?
- शिवराज सिंग चौहान – 45%
- ज्योतिरादित्य सिंधिया – 26%
- दिग्विजय सिंग – 3%
- कैलास विजयवर्गीय – 2%
=========================================================== राजस्थान विधानसभा निवडणूक – 2013 =========================================================== राजस्थान विधानसभेवर भाजपचा झेंडा राजस्थानमध्ये आयबीएन नेटवर्क-सीएसडीएस आणि द वीकने पोस्ट पोल सर्व्हे नुसार राजस्थान विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. 200 जागांसाठी घेण्यात आलेल्या मतदानानुसार जनतेनं काँग्रेस सरकारला चांगलाच हात दाखवला असून भाजपच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या आहे. भाजप 126 ते 136 जागा मिळेल. तर काँग्रेसला शंभर जागा मिळवता येणार नाही. काँग्रेसची मजल 49 ते 57 जागापर्यंत असणार आहे. मतांची टक्केवारी पाहिली तर मागिल वेळी काँग्रेसला 36.8 टक्के होती ती यावर्षी 3 टक्क्यांनी घसरली असून 33 टक्क्यांवर आलीय. तर भाजपला मागिल वेळा 34 टक्के इतकी मतांची टक्केवारी होती ती यावेळी 9 टक्यांनी वाढून 43 टक्के झाली. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपचा संधी द्यावी असं 50 टक्के जनतेनं कौल दिलाय. त्यामुळे वसुधरा राजे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असं दिसतंय. मतांचा टक्केवारी —————————————————————————— पक्ष 2008 डिसें.2013 फरक —————————————————————————— काँग्रेस 36.8% 33% -4% भाजप 34.3% 43% +9% बसप 7.6% 5% -3% इतर 21.3% 19% -2% —————————————————————————— =========================================================== जागांचा अंदाज एकूण जागा – 200
- भाजप – 126-136
- काँग्रेस – 49-57
- इतर – 12-20
=========================================================== मुख्यमंत्री कोण व्हावा ?
- वसुंधरा राजे – 49%
- अशोक गेहलोत – 27%
- सी पी जोशी – 2%
- सचिन पायलट – 1 %
- किरोरीलाल मीणा – 5%
=========================================================== पंतप्रधान कोण व्हावा ?
- नरेंद्र मोदी – 51%
- राहुल गांधी – 23%
- सोनिया गांधी – 3%
- मनमोहन सिंग – 4%
- लालकृष्ण अडवाणी – 0%
=========================================================== स्थानिक स्थिती * ग्रामीण – भाजपची जोरदार आघाडी * शहर – काँग्रेस-भाजपमध्ये चुरशीची लढत ===========================================================