जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / रिंगमास्टर चॅपेलनी राहुलला हटवण्याचा रचला होता कट -सचिन

रिंगमास्टर चॅपेलनी राहुलला हटवण्याचा रचला होता कट -सचिन

रिंगमास्टर चॅपेलनी राहुलला हटवण्याचा रचला होता कट -सचिन

03 नोव्हेंबर : भारताचे माजी कोच ग्रेग चॅपेल हे रिंगमास्टरप्रमाणे वागत होते आणि खेळाडूंवर स्वतःच्या कल्पना लादत होते अशी खरमरीत टीका क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने केलीय. सचिनने आपल्या ‘प्लेइंग इन माय वे’ या आपल्या आत्मचरित्रात हा खळबळजनक खुलासा केलाय. इतकंच नव्हे तर 2007 मध्ये ग्रेग चॅपेल राहुल द्रविडला हटवण्याचं कारस्थान रचत होते असा खुलासाही सचिननं केलाय. विशेष म्हणजे आजपर्यंत सचिनने कुणावरही टीका केली नाही. त्याच्यावर ज्यांनी टीका केली त्यांना मैदानात बॅटने उत्तर दिलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

    Tendulkar autobiography 03 नोव्हेंबर : भारताचे माजी कोच ग्रेग चॅपेल हे रिंगमास्टरप्रमाणे वागत होते आणि खेळाडूंवर स्वतःच्या कल्पना लादत होते अशी खरमरीत टीका क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने केलीय. सचिनने आपल्या ‘प्लेइंग इन माय वे’ या आपल्या आत्मचरित्रात हा खळबळजनक खुलासा केलाय. इतकंच नव्हे तर 2007 मध्ये ग्रेग चॅपेल राहुल द्रविडला हटवण्याचं कारस्थान रचत होते असा खुलासाही सचिननं केलाय. विशेष म्हणजे आजपर्यंत सचिनने कुणावरही टीका केली नाही. त्याच्यावर ज्यांनी टीका केली त्यांना मैदानात बॅटने उत्तर दिलं. मात्र पहिल्यांदाच सचिनची आत्मचरित्रातून धक्कादायक ‘इनिंग’ पाहण्यास मिळणार आहे. सचिनचा खुलासा “वर्ल्ड कपच्या काहीच महिने आधी चॅपेल माझ्या घरी आले होते. मी राहुलकडून कॅप्टन्सी स्वत:कडे घ्यावी असं त्यांनी सुचवल्यामुळे मी चकित झालो. अंजली माझ्याबरोबर बसली होती, तिलाही धक्का बसला. चॅपेल म्हणत होते की, ‘आपण एकत्रपणे अनेक वर्षं भारतीय क्रिकेटवर राज्य करू शकू’ आणि ते मला कॅप्टन्सी परत मिळवण्यासाठी मदत करतील. क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा फक्त काही महिन्यांवर आली असताना, कोचला कॅप्टनबद्दल जराही आदर नसल्याचं पाहून मी, आश्चर्यचकित झालो होतो. मी त्यांचा प्रस्ताव तिथेच फेटाळून लावला. ते दोन तास माझी समजूत काढत बसले होते.” +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात