1 एप्रिल : ‘महायुतीमध्ये ‘एका’ व्यक्तीमुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र मोदी व राजनाथ सिंह या भाजप नेत्यांनी शिवसेनेची साथ सोडणार नाही असे आश्वासन दिल्याने महायुती मजबूत झाली आहे. मतफुटीची भीती बळगू नका. जनतेला स्थिर आणि मजबूत सरकार हव आहे. ते त्यासाठी योग्या मतदान करतील आणि मतफुटीवाल्यांना उडवून लावतील’ असा विश्वासही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनी यावेळेस व्यक्त केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मनसे आणि आम आदमी पर्टीवर टीका केली आहे.
‘गल्लीत दादागिरी आणि दिल्लीत लाचारी करणार्यांना घरी बसवा’ असा घणाघाती हल्ला त्यांनी मनसेवर केला. राज ठाकरेंनी कालच्या सभेत सेना आणि उद्धववर सडकून टीका केल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी मनसेवर टीका केली आहे. मनसेला कोणत्याही परिस्थितीत महायुतीत सामील होऊ शकत नाही. मोदी आणि राजनाथ सिंह यांनीच तसं स्पष्ट सांगितलं आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे. ‘मनसेचं राजकारण हे अवसानघातकी आहे आणि मी पाठीत वार कधीच करणार नाही असंही ते म्हणालेत. त्यामुळे ‘अपक्ष उमेदवार उभा राहिला तर थोडी मतं खातात’ असा टोला त्यांनी मनसेला लगावला आहे.
मुद्दाम शिवसेनेच्या विरोधात उमेदवार दिले मनसेने राष्ट्रवादी निवडूनयावी यासाठी शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे केल्याचा आरोप उद्धव यांनी केला आहे.
गडकरींना सवाल नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे महायुतीत तणाव निर्माण झाला होता. गडकरींना पक्षनेतृत्वानं पुढाकार घेण्यास सांगितलं होतं का असा सवाल उद्धव यांनी केलं आहे.
‘आप’चा झाडू चालणार नाही ‘आप’चा झाडू महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही. शिवसेना हाच आम जनतेचा आवाज असल्याचं उद्धव यांनी स्पष्ट केलं. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील टीम अण्णाने आता अण्णा हजारेंनाच टीममधून दूर केले. जी टीम अण्णांना जुमानत नसेल ती टीम सरकार चालवू शकणार नाही अशी घणाघाती टीका त्यांनी आपवर केली आहे. या पक्षाला मुंबईकर साथ देणार नाहीत असे त्यांनी सांगितले.