10 ऑगस्ट : डोंगरकडा कोसळून उद्ध्वस्त झालेल्या माळीण गावातील दुर्घटनेत मृत पावलेल्यांचा सामूहिक दशक्रिया विधी आज पार पडला. 30 जुलै रोजी घडलेल्या या दुर्घटनेत 43 घरं गाडली गेली होती. त्यात 151 ग्रामस्थांचा मृत्यू झाला. या सर्व मृतांवर आज सामूहिक दशक्रिया विधी करण्यात आला. सकाळी 8.30 ते 10.30 दरम्यान हा विधी झाला.
या विधीसाठी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड आणि इथले खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते. माळीण दुर्घटनेतल्या मृतांचं स्मारक बांधण्यात येईल अशी घोषणा आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी केलीय.
या दुर्घटनेनंतर जवळपास 8 दिवस बचावकार्य सुरू होतं. या बचावकार्यात पहिल्या दोन दिवसात 8 जणांना जिवंत बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश मिळालं होतं. या भूस्खलनात तब्बल 151 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आज माळीण गावात फक्त मातीचे ढिगारे आणि गावाची आठवण करून देणारे घरांचे शाळेचे अवशेष उरले आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++