मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बोधगया स्फोट :48 तास उलटले पण तपास वार्‍यावरच

बोधगया स्फोट :48 तास उलटले पण तपास वार्‍यावरच

budha gaya blast09 जुलै : बोधगयामधल्या झालेल्या बॉम्बस्फोटाला 48 तास उलटून गेले आहेत. तरीही तपास कार्यातकाहीही निष्पन्न झालेलं नाही. सोमवारी बिहार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केले पण त्यात काही ठोस मिळलेलं नाही. त्यामुळेच हल्ला करणार्‍यांना या सीसीटीव्ही कॅमेराची पूर्व माहिती असल्याचा आता अंदाज बांधला जातोय.

पोलिसांनी या प्रकरणी एका जणाला ताब्यात घेतलं आहे पण तीन संशयितांवर संशय व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर इंडियन मुजाहिद्दीन तसंच म्यानमारमधल्या घटकांचा तपास सुरु करण्यात आला आहे. बॉम्बस्फोटांसाठी टायमर वापरल्याचा अहवाल एनएसजीच्या वैद्यकीय टीमनं दिलाय.

तसंच बॉम्बस्फोटांसाठी अमोनियम नायट्रेट, गंधक आणि पोटॅशियम यांचा वापर करण्यात आल्याचंही एनएसजीच्या तपासात आढळलंय. धक्कादायक म्हणजे स्फोटाबाबत अगोदरच गुप्तचर खात्याने इशारा दिला होता. तरी रविवारी पहाटे महाबोधी मंदिरात दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणले. मंदिराच्या परिसरात एकूण 10 स्फोट झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

First published:

Tags: Congress, Narendra modi, Police, Police released CCTV, Terror attack, बोधगया स्फोट