Home /News /news /

फास आवळला, 'कॅम्पा कोला'वर हातोडा पडणार

फास आवळला, 'कॅम्पा कोला'वर हातोडा पडणार

s33campa_cola19 जून : मुंबईतील वरळी येथील कॅम्पा कोला कम्पाऊंडवर अनधिकृत मजल्यांवर हातोडा पडणार हे आता स्पष्ट झालंय. कॅम्पा कोलावरील कारवाईसाठी दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे. कॅम्पा कोलावर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस आता कामाला लागले आहेत. इमारतीच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. याचाच अर्थ, कारवाई लवकरच होणार याचे पोलिसांकडून संकेत मिळाले आहेत. कॅम्पाकोलाच्या 102 अनधिकृत फ्लॅट्सवर कारवाई होणार आहे. कॅम्पाकोलाच्या पाचव्या मजल्याच्यावरील हे फ्लॅट्स आहेत. एकूण सात इमारतींमध्ये हे फ्लॅट्स आहेत. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: BMC, Mumbai, Sc, Supreme court decision, Varli, कॅम्पा कोला, कॅम्पा कोलावर हातोडा, मुंबई महानगर पालिका

पुढील बातम्या