जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पंतप्रधान राजीनामा देणार ही अफवा - पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान राजीनामा देणार ही अफवा - पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान राजीनामा देणार ही अफवा - पंतप्रधान कार्यालय

31 डिसेंबर :पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग 3 जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देणार असल्याच्या अफवेला आता पूर्णविराम मिळाला आहे. या बातमीत काहीच तथ्य नसून ही फक्त अफवा असल्याचा खुलासा पंतप्रधान कार्यालयाने केला आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता एका इंग्रजी वर्तमानपत्राने वर्तवली होती. पण ही अफवा असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं आज स्पष्ट केले आहे. भ्रष्टचार, महागाई अशा विविध प्रश्नांमुळे पंतप्रधान मनमोहन सिंग टीकेचे लक्ष्य ठरले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

    Image img_144202_manmohansing_240x180.jpg31 डिसेंबर :पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग 3 जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देणार असल्याच्या अफवेला आता पूर्णविराम मिळाला आहे. या बातमीत काहीच तथ्य नसून ही फक्त अफवा असल्याचा खुलासा पंतप्रधान कार्यालयाने केला आहे.

    पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता एका इंग्रजी वर्तमानपत्राने वर्तवली होती. पण ही अफवा असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं आज स्पष्ट केले आहे. भ्रष्टचार, महागाई अशा विविध प्रश्नांमुळे पंतप्रधान मनमोहन सिंग टीकेचे लक्ष्य ठरले होते. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला होता. इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग लोकसभा निवडणुकीपूर्वी राजीनामा देतील असा दावा करण्यात आला. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच पंतप्रधान पत्रकार परिषद घेऊन याची औपचारिक घोषणा करतील असं या वृत्तात म्हटले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या जागी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पंतप्रधानपदी वर्णी लागण्याची शक्ता असल्याचं यात म्हटलं जात होते. पण पंतप्रधान कार्यालय त्या आधीच ही सगळी एक अफवा असल्याचं स्पष्ट केले आहे. वर्ष संपताना लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहायला लागले आहेत. दिल्लीतही घडामोडींना सुरूवात झाली आहे. नवीन वर्षात पंतप्रधान मनमोहन सिंग 3 जानेवारीला पत्रकार परिषद घेणार आहेत. गेल्या 3 वर्षांमधली पंतप्रधानांची ही पहिलीच औपचारिक पत्रकार परिषद असेल. 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावा यासाठी काँग्रेसवर प्रचंड दबाव येत आहे. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींचं नाव घोषित होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्याच पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद होणार असल्याचं मानलं जात आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात