जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / नोटाबंदीवर स्थगितीला सुप्रीम कोर्टाचा नकार

नोटाबंदीवर स्थगितीला सुप्रीम कोर्टाचा नकार

नोटाबंदीवर स्थगितीला सुप्रीम कोर्टाचा नकार

15 नोव्हेंबर : 500 आणि 1000 नोटा चलनातून रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम राखला आहे. नोटाबंदीवर स्थगिती आणण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर काळा पैशावाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले. अखेर नोटबंदीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्यात. आज सुप्रीम कोर्टात 4 याचिकांवर सुनावणी झाली. तर मुंबई उच्च न्यायालयातही आज नोटबंदीच्या विरोधात याचिकेवर सुनावणी होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    court_on_notes 15 नोव्हेंबर : 500 आणि 1000 नोटा चलनातून रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम राखला आहे. नोटाबंदीवर  स्थगिती आणण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर काळा पैशावाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले. अखेर नोटबंदीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्यात.

    आज सुप्रीम कोर्टात 4 याचिकांवर सुनावणी झाली. तर मुंबई उच्च न्यायालयातही आज नोटबंदीच्या विरोधात याचिकेवर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलंय. तसंच 500 आणि 1000 च्या नोटाबंदीच्या निर्णयावर स्थगिती आणता येणार नाही असंही कोर्टाने स्पष्ट केलं. लोकांची होणारी गैरसोय पाहता केंद्र सरकारने उपाययोजना कराव्यात असे निर्देशही कोर्टाने सरकारला दिले.

    जाहिरात

    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात