जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 'नया है वह'-'सामना'तून उडवली राजची खिल्ली

'नया है वह'-'सामना'तून उडवली राजची खिल्ली

'नया है वह'-'सामना'तून उडवली राजची खिल्ली

14 फेब्रुवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टोल आंदोलनावर ‘नया है वह’ अशी टीका सामनाच्या आग्रलेखाच आज केली आहे . मनसेचे टोलविरोधी आंदोलन , रास्ता रोको वगैरे प्रकार ज्या प्रकारे कोसळला त्यावर ‘नया है वह’ अशी गंमतीशीर प्रतिक्रिया लोकांमध्ये उमटत आहे अशी जहाल टीका सामनात करण्यात आली आहे. आंदोलक दोनच्या आत घरी गेल. कुठल्याही आंदोलनाचे नाटक होऊ नये आणि नाटकाचा वग होऊ नये तसं झालं तर जनताच अशा नाटकांवर बहिष्कार टाकते असं सेनेच्या मुखपत्रात म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    udhav on raj 14 फेब्रुवारी :  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टोल आंदोलनावर ‘नया है वह’ अशी टीका सामनाच्या आग्रलेखाच आज केली आहे . मनसेचे टोलविरोधी आंदोलन , रास्ता रोको वगैरे प्रकार  ज्या प्रकारे कोसळला त्यावर ‘नया है वह’ अशी गंमतीशीर प्रतिक्रिया लोकांमध्ये उमटत आहे अशी जहाल टीका सामनात करण्यात आली आहे. आंदोलक दोनच्या आत घरी गेल. कुठल्याही आंदोलनाचे नाटक होऊ नये आणि नाटकाचा वग होऊ नये तसं झालं तर जनताच अशा नाटकांवर बहिष्कार टाकते असं सेनेच्या मुखपत्रात म्हटलं आहे. . कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलनाचा उद्रेक शिवेसेनेने घडवल्यानंतर महाराष्ट्राला या प्रश्नी जाग आली आणि त्या जागे झालेल्यांत मनसे आणि राष्ट्रवादीसारख्या पक्षांचा समावेश आहे अशा शब्दात सेनेन टोल आंदोलनाचे श्रेयही स्वत:कडे घतेलं. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ‘टोलप्रश्नी ’ चर्चेची दारं खुली करुन सह्याद्रीवर बैठक वगैरे घेतली आता उद्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी मनसे किती जागा लढवणार आहे आणि त्यांचे उमेदवरा कोण आहेत ते सुद्धात्यांनी जाहीर करावे अशा खोचक शब्दात सामनाने मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात