जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 'दांडीबहाद्दर सचिन आणि रेखाची खासदारकी रद्द करा'

'दांडीबहाद्दर सचिन आणि रेखाची खासदारकी रद्द करा'

'दांडीबहाद्दर सचिन आणि रेखाची खासदारकी रद्द करा'

08 ऑगस्ट : क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्यांना घाम फोडणारा, विक्रमादित्य,भारतरत्न आणि खासदार अशी बहुमान मिरवणार्‍या सचिन तेंडुलकरची राजकीय इनिंग वादात सापडलीय. खेळामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सचिनला राज्यसभेची खासदारकी बहाल करण्यात आली पण सचिन राज्यसभेत गैरहजर राहत असल्याचा सूर सदस्यांनी लगावला. सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखाच्या सततच्या गैरहजेरीचा मुद्दा सीपीएमचे खासदार पी. राजीवनी हा मुद्दा उपस्थित केला. जाहिरात आतापर्यंत रेखा फक्त 5 वेळा तर सचिन केवळ तीन वेळा राज्यसभेत उपस्थित राहिलाय. यावर्षी सचिन राज्यसभेत एकही दिवस हजर राहिलेला नाहीय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    sachin and rekha 08 ऑगस्ट : क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्यांना घाम फोडणारा, विक्रमादित्य,भारतरत्न आणि खासदार अशी बहुमान मिरवणार्‍या सचिन तेंडुलकरची राजकीय इनिंग वादात सापडलीय. खेळामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सचिनला राज्यसभेची खासदारकी बहाल करण्यात आली पण सचिन राज्यसभेत गैरहजर राहत असल्याचा सूर सदस्यांनी लगावला. सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखाच्या सततच्या गैरहजेरीचा मुद्दा सीपीएमचे खासदार पी. राजीवनी हा मुद्दा उपस्थित केला.

    जाहिरात

    आतापर्यंत रेखा फक्त 5 वेळा तर सचिन केवळ तीन वेळा राज्यसभेत उपस्थित राहिलाय. यावर्षी सचिन राज्यसभेत एकही दिवस हजर राहिलेला नाहीय. एखादा सदस्य रीतसर रजा न घेता 60 दिवस गैरहजर राहिला तरच सदस्यत्व रद्द होतं, असं उपसभापती पी. जे. कुरियन यांनी स्पष्ट केलंय. सचिन आणि रेखाच्या बाबतीत असं नाही असंही त्यांनी सांगितलं.

    मात्र राज्यसभेच्या सदस्यांनी सचिनच्या गैरहजेरीवर नाराजी व्यक्त केलीय.खासदारपद ही काही ट्रॉफी नव्हे , सचिनने सदनात आलं पाहिजे. ही एक मोठी जबाबदारी आहे त्यामुळे अनुपस्थिती योग्य नव्हे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी दिली. तर आपल्यावर सोपवलेली जबाबदारी सचिनने पार पाडावी, संसदेत हजर राहणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी दिली.

    जाहिरात

    तर सचिनच्या खासदारकीसाठी पुढाकार घेणारे काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांनी सचिनला आता काही जबरदस्ती करू शकत नाही अशी सावध प्रतिक्रिया दिली. सचिनला 2012 मध्ये खासदारकी देऊन सन्मान करण्यात आला होता. सचिनसोबतच रेखा यांनाही खासदारकी देण्यात आली होती. सचिनच्या खासदारकीचा कार्यकाळ हा 26 एप्रिल 2018 पर्यंत असणार आहे. पण सतत गैरहजर राहिल्यामुळे सचिनची खासदारकी रद्द करा अशी मागणी आता सदस्यांनी केलीय.

    जाहिरात

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात