17 मार्च : शिवसेनेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर राष्ट्रवादीत दाखल झाले आहे पण विजय गावितांच्या भाजपप्रवेशाची राष्ट्रवादीला कुणकुण लागलीय.राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मंत्रिमंडळातून आणि पक्षातून बडतर्फ करण्याचा इशारा आज (सोमवारी) राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यंत्री अजित पवार यांनी दिलाय.
गावित सध्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. त्यांची मुलगी हीना गावित भाजपतर्फे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं आहेत. त्या उद्या मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
पण, भाजपसारख्या जातियवादी पक्षाकडून जर विजयकुमार गावितांनी आपल्या मुलीला तिकीट दिलं, तर त्यांची मंत्रिमंडळातून आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असा इशारा अजित पवार यांनी दिलाय. दरम्यान, मी अजूनही राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता आहे, असं विजयकुमार गावित म्हणत आहे. माझ्याकडे कुणी राजीनामा मागितलेला नाही, असंही त्यांनी सांगितलंय.

)







