मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /गुरुजी ऐका !, शाळेत तंबाखू सेवन कराल तर नोकरीला मुकणार

गुरुजी ऐका !, शाळेत तंबाखू सेवन कराल तर नोकरीला मुकणार

  techar_tanmhaku08 जानेवारी : आता शिक्षकांना शाळेच्या आवारात किंवा वर्गात व्यसन करणं महागात पडणार आहे. शाळेत गुटखा,तंबाखू,खर्रा,सिगारेट आणि दारू पिल्यास नोकरीला मुकावं लागणार आहे. राज्याच्या शिक्षण सहसंचालकांनी एक पत्र काढून हा इशारा दिलाय.

  विद्यार्थ्यांसमोर व्यसन केल्यानं कोवळ्या वयात मुलही गुरूजींच्या व्यसनाचं अनूकरण करतात असं आढळून आलंय. त्यामुळे ओरिएंटल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरमनं शिक्षण खात्याकडे मागणी केली होती. ती मागणी मान्य करून शिक्षण विभागानं गुरूजींच्या व्यसनाला पायबंद बसावा म्हणून हे पाऊल उचलंल आहे. जर शिक्षक शाळेच्या वर्गात किंवा आवारात व्यसन करतांना दिसला तर त्याला विविध कारवाईला सामोरं जावं लागेल. शिक्षकांचे प्रमोशन थांबवलं जावू शकतं. आदर्श शिक्षक किंवा त्यांना कोणाताच पुरस्कार मिळणार नाही. शासनाच्या सोईसुविधा सुद्धा बंद केल्या जावू शकतात किंवा सांगूनही शिक्षक जर व्यसन करीत असल्यास त्याला बडतर्फ करण्याचे आदेशात सांगण्यात आलंय. औरंगाबादेत या आदेशाबद्दल कडक पाऊल उचलली जाणार आहेत. शिक्षकांनी या आदेशाचं स्वागत केलंय.

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

  [if0] Follow @ibnlokmattv[sc0]

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  First published:
  top videos

   Tags: School, Techer