10 डिसेंबर : दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या दणदणीत विजयाला गालबोट लागण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीचे सीमापुरीतले नवनिर्वाचित आमदार धर्मेंद्र कोहली यांच्यावर पराभूत झालेल्या माजी काँग्रेस आमदाराच्या पत्नीने विनयभंगाचा आरोप केला आहे. विजयोत्सव साजरा करताना कोहली आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्या घरात घुसून गैरवर्तन केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार वीर सिंग धिंगण यांच्या पत्नीने केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.