जाहिरात
मराठी बातम्या / देश / Zomato बॉयचा अपघाती मृत्यू; कुटुंबाच्या मदतीसाठी धावले Twitter यूजर्स, जमा केले लाखो रुपये

Zomato बॉयचा अपघाती मृत्यू; कुटुंबाच्या मदतीसाठी धावले Twitter यूजर्स, जमा केले लाखो रुपये

खाद्य पदार्थांचे बिल
आपल्या सर्वांना कधी ना कधी बाहेरून जेवण मागवावं लागतं, पण जर तुम्ही आठवड्यातील दोन दिवस काही खास पदार्थ घरीच बनवायचे ठरवले तर तुम्हाला बाहेरचे काही खाण्याची फारशी इच्छा होणार नाही. तुमची लालसाही शांत राहील आणि तुमचे पैसे जास्त खर्च होणार नाहीत. अनेकांच्या हे लक्षात येत नाही, मात्र बाहेर खाण्यामध्ये खूप पैसे खर्च होतात.

खाद्य पदार्थांचे बिल आपल्या सर्वांना कधी ना कधी बाहेरून जेवण मागवावं लागतं, पण जर तुम्ही आठवड्यातील दोन दिवस काही खास पदार्थ घरीच बनवायचे ठरवले तर तुम्हाला बाहेरचे काही खाण्याची फारशी इच्छा होणार नाही. तुमची लालसाही शांत राहील आणि तुमचे पैसे जास्त खर्च होणार नाहीत. अनेकांच्या हे लक्षात येत नाही, मात्र बाहेर खाण्यामध्ये खूप पैसे खर्च होतात.

काही दिवसांपूर्वी, 36 वर्षीय सलिल त्रिपाठी(Salil Tripathi) यांचा अपघातमध्ये मृत्यू झाला. घरामध्ये एकमेव कमावते असलेल्या त्रिपाठीच्या जाण्यानंतर सोशल मीडिया यूजर्स त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी धावले आहेत. त्यांनी लाखो रुपये जमा करत अर्थिक मदत केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जानेवारी: दुचाकीवरून घरोघरी जाऊन ग्राहकांना हवे ते खाद्यपदार्थ वेळेत पुरवणारे झोमॅटो बॉय (Zomato) मोठ्या शहरात जागोजागी दिसतात. रात्र असो, कडाक्याची थंडी किंवा मुसळधार पाऊस असो, ऑनलाइन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) कर्मचारी ग्राहकांना कोणत्याही परिस्थीत झोमॅटो बॉय ग्राहकांपर्यंत अन्न पोहचवतात. यामध्ये सलिल त्रिपाठी (Salil Tripathi) हा व्यक्तीदेखील सहभागी होता. काही दिवसांपूर्वी, 36 वर्षीय सलिल त्रिपाठी यांचा अपघातमध्ये मृत्यू झाला. घरामध्ये एकमेव कमावते असलेल्या त्रिपाठीच्या जाण्यानंतर  सोशल मीडिया यूजर्स त्याच्या कुटूंबाच्या मदतीसाठी धावले आहेत. त्यांनी लाखो रुपये जमा करत अर्थिक मदत केली आहे. चित्रपट निर्माते मनीष मुंद्रायांनी मंगळवारी ट्विटद्वारे त्यांच्या वतीने करण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली. याआधी त्यांनी एक बातमी शेअर करून सलील त्रिपाठी यांच्या पत्नीचे बँक तपशील मिळविण्यासाठी मदत मागितली होती. मुंद्रा यांनी मृताची पत्नी सुचेता त्रिपाठी यांना 4 लाख रुपये दिल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयानंतर ट्विटरवर मदतीचा हात पुढे आले. अनेक युजर्सनी त्रिपाठी यांच्या कुटुंबाला मदत करण्याची कल्पना शेअर केली.

News18

सुचेता आणि तिच्या मुलाला मदत करण्यासाठी अनेक लोकांनी संपर्क साधून पैसे दान केले आहेत. लोकांनी दान केलेल्या पैशांतून 8 लाख रुपये जमा झाल्याचे सलीलच्या चुलतभावाने सांगितले. अपघातात मृत्यू सलील हा हॉटेल मॅनेजनेंटचा पदवीधर असून त्याने कोरोना काळात त्याची नोकरी गमावल्यानंतर झोमॅटोमध्ये काम सुरु केलं होतं. मागच्या आठवड्यात तो कामावर असताना दिल्ली पोलिस हवालदाराच्या चारचाकी गाडीने त्याला धडक दिली होती आणि या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. तो त्याच्या घरातील एकमेव कमावता व्यक्ती होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार हरवला होता.

अपघातात मृत्यू झालेल्या झोमॅटो बॉयच्या पत्नीला कंपनीकडून नोकरी

आम्ही सलीलच्या कुटुंबाला मदत करू, तसेच सलीलच्या पत्नीला नोकरी देण्याचे आश्वासन झोमॅटोचे संस्थापक दिपिंदर गोयल (Zomato Founder Deepinder Goyal) यांनी गुरुवारी ट्वीटद्वारे दिले आहे. गुरुवारी, गोयल यांनी एक ट्विट द्वारे असे सांगितले की, झोमॅटोच्या कर्मचार्‍यांनी कुटुंबासाठी एकत्रितपणे 12 लाख आणि विमा संरक्षणानुसार अतिरिक्त 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल. पुढे ते म्हणाले की, सलीलच्या पत्नीला नोकरी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जेणेकरुन ती त्यांच्या 10 वर्षाच्या मुलाचा खर्च करु शकेल. तसेच झोमॅटोच्या अधिका-यांनी सांगितले की ते घटनेपासून कुटुंबाच्या संपर्कात आहेत आणि शक्य ती सर्व मदत दिली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Zomato
  • First Published :
जाहिरात
जाहिरात