जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोनानंतर आता नव्या जीवघेण्या व्हायरसचं संकट; पुण्यापाठोपाठ इथेही आढळला रुग्ण

कोरोनानंतर आता नव्या जीवघेण्या व्हायरसचं संकट; पुण्यापाठोपाठ इथेही आढळला रुग्ण

कोरोनानंतर आता नव्या जीवघेण्या व्हायरसचं संकट; पुण्यापाठोपाठ इथेही आढळला रुग्ण

पुण्यानंतर कर्नाटकात झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. रायचूर जिल्ह्यातल्या पाच वर्षांच्या मुलीला या व्हायरसची लागण झाली आहे.

  • -MIN READ Trending Desk Karnataka
  • Last Updated :

    नवी दिल्ली 13 डिसेंबर : गेल्या दोन वर्षांपासून जगभरातल्या नागरिकांना कोरोना महामारीचा सामना करावा लागत आहे. सध्या कोरोनाच्या प्रसाराची तीव्रता फार कमी झाली असली, तरी अजूनही काही ठिकाणी रुग्ण आढळत आहेत. चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये दिसत आहेत. भारताचा विचार केल्यास, कोरोनाचा धोका जवळपास संपुष्टात आला आहे; मात्र आता कोरोनानंतर आणखी एक नवीन संकट येण्याची शक्यता आहे. आता झिका व्हायरसमुळे सरकारची आणि आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. पुण्यानंतर कर्नाटकात झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सोमवारी (12 डिसेंबर) दिलेल्या माहितीनुसार, रायचूर जिल्ह्यातल्या पाच वर्षांच्या मुलीला या व्हायरसची लागण झाली आहे. ही राज्यातली पहिलीच घटना आहे. सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून, लवकरच याबाबत मार्गदर्शक तत्त्वं जारी केली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ‘एबीपी न्यूज’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कोरोनामुळे टीनएजर्सचा मेंदू होतोय अकाली वृद्ध; संशोधकांचा धक्कादायक दावा झिका व्हायरस म्हणजे काय? झिका व्हायरस हा डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. एडिस डासांच्या माध्यमातून हा पसरतो. हे डास दिवसा जास्त सक्रिय असतात. या विषाणूमुळे होणारा संसर्ग धोकादायक असतो. प्रसंगी या संसर्गामुळे जीवही जाऊ शकतो. व्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते. 5 डिसेंबरला पाठवण्यात आले होते तीन नमुने कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर म्हणाले, “पुण्यातल्या लॅबमधून आम्हाला मिळालेल्या अहवालात एका मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याची खात्री झाली आहे. 5 डिसेंबर रोजी राज्यातून एकूण तीन रक्ताचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले होते. इतर दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेली मुलगी पाच वर्षांची आहे. सध्या आरोग्य विभाग या मुलीवर लक्ष ठेवून आहे.” आता केलेली तुमची एक चूक पडेल महागात; WHO कडून सर्वात मोठ्या धोक्याचा Alert! राज्य सरकार घेत आहे खबरदारी आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं, की सरकार खबरदारी घेत असून रायचूर आणि शेजारच्या जिल्ह्यांतल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच कोणत्याही रुग्णालयात संशयित संसर्गाची प्रकरणं आढळल्यास झिका व्हायरस चाचणीसाठी नमुने पाठविण्यास सांगण्यात आलं आहे. सध्या ज्या मुलीला या विषाणूची लागण झाली आहे, तिची कोणताही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. तिला व्हायरसची लागण झाल्याचं समजताच राज्यात खबरदारीच्या उपाययोजना लागू करण्याचा विचार केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये झिका व्हायरसचे रुग्ण आढळले होते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: corona , zika
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात