मराठी बातम्या /बातम्या /heatlh /आता केलेली तुमची एक चूक पडेल महागात; WHO कडून सर्वात मोठ्या धोक्याचा Alert!

आता केलेली तुमची एक चूक पडेल महागात; WHO कडून सर्वात मोठ्या धोक्याचा Alert!

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

WHO ने नागरिकांना एका धोक्याबाबत सावध करत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

जिनिव्हा, 12 डिसेंबर : गेली दोन वर्षे कोरोना महासाथीशी दोनहात करण्यात गेली. आता कुठे कोरोनातून सुटकेचा श्वास मिळाला आहे. नव्या वर्षात कोरोनाचं संकट नको, अशी प्रार्थनाच किती तरी जण करत असतील. पण हे आता तुमच्या हातातच आहे. कारण आता केलेली तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. जागतिक आरोग्य संघटनेने सर्वात मोठ्या धोक्याबाबत सावध केलं आहे.

डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. WHO च्या कोव्हिड टेक्निकल हेड  मारिया व्हॅन केरखोवे यांनी ट्वीट केलं आहे.

मारिया व्हॅन केरखोवे म्हणाल्या, कोव्हिड-19, फ्ल्यू, आरएसव्ही आणि इतर विषाणू या कालावधीत खूप वेगाने पसरतात. त्यामुळे स्वतःला आणि तुमच्या प्रिय व्यक्तींना सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा. लस घ्या, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, स्वच्छता राखा आणि सेल्फ टेस्ट करा.

दरम्यान याआधीही काही तज्ज्ञांनी हिवाळ्यात कोरोनाची लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली होती. तुम्ही काळजी घेतली नाही तर ही शक्यता प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही.

हे वाचा - एक इंच आल्याचा तुकडाच करेल कमाल; हिवाळ्यातील सर्व समस्यांपासून देईल आराम

गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत संसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञांनी हिवाळ्यात कोरोनाचा धोका किती वाढू शकतो याबाबत सांगितलं होतं. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे ५०० पेक्षा जास्त सब-व्हेरिएंट्स आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या व्हेरिएंटचा प्रसार, रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देण्याची क्षमता आणि गंभीरता यावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Health, Lifestyle, Who