मराठी बातम्या /बातम्या /देश /कोरोना काळात एक लाख जण येणार एकत्र,'या' मुख्यमंंत्र्यांची बहीण स्थापन करणार नवा पक्ष

कोरोना काळात एक लाख जण येणार एकत्र,'या' मुख्यमंंत्र्यांची बहीण स्थापन करणार नवा पक्ष

जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या बहीण वायएस शर्मिला (Y. S. Sharmila) या नवा पक्ष स्थापन करणार आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये या पक्षाच्या स्थापना सभेच्या निमित्तानं अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या बहीण वायएस शर्मिला (Y. S. Sharmila) या नवा पक्ष स्थापन करणार आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये या पक्षाच्या स्थापना सभेच्या निमित्तानं अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या बहीण वायएस शर्मिला (Y. S. Sharmila) या नवा पक्ष स्थापन करणार आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये या पक्षाच्या स्थापना सभेच्या निमित्तानं अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

हैदराबाद, 8 एप्रिल : देशात सध्या कोरोना रुग्णांची (Covid-19) संख्या वाढत आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. त्याचबरोबर निवडणूक प्रचार राजकीय सभांवर होणाऱ्या गर्दीबाबत नेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका  दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) दाखल झाली आहे.

देशभरात इतक्या सर्व चिंताजनक घडामोडी घडत असतानाही तेलंगणात (Telangana) नवा राजकीय पक्ष स्थापन होणार असून या पक्षाच्या स्थापनेच्या निमित्तानं एक लाखांची जंगी सभा आयोजित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या बहीण वायएस शर्मिला (Y. S. Sharmila) या नवा पक्ष स्थापन करणार आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये या पक्षाच्या स्थापना सभेच्या निमित्तानं अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

शर्मिला शुक्रवारी खम्मममध्ये राजकीय सभा घेणार आहेत. या सभेला त्यांनी 'संकल्प सभा' असं नाव दिलं आहे. या सभेला एक लाख जणांची गर्दी होईल असा अंदाज आहे. इतकंच नाही तर हैदराबादमधील निवास स्थानापासून 1000 गाड्यांच्या ताफ्यासह शर्मिला सभेच्या ठिकाणी पोहचणार आहेत.

खम्मम हा शर्मिलाचे वडील आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी (Y.S. Rajasekhara Reddy) यांचा बालेकिल्ला होता. शर्मिला यांचे भाऊ आणि सध्या आंध्रचे मुख्यमंत्री असलेले जगनमोहन रेड्डी 2014 साली खम्मममधूनच एका लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.

शुक्रवारी होणाऱ्या 'संकल्प सभेत' शर्मिला त्यांच्या पक्षाचं नाव, झेंडा आणि विचारधारा जाहीर करणार आहे. राज्यातील सत्तारुढ पक्ष राजकीय कारणांमुळे आपल्या सभेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप शर्मिला यांनी केला आहे.

तेलंगणातील कोरोना परिस्थिती

तेलंगणामध्ये कोरोनाचे 2055 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 3.18 लाखांवर पोहचली आहे. सात आणखी रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे मृतांची संख्या 1,741 झाली आहे.

कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नेत्यांवर कारवाई का नाही? हायकोर्टाचा सवाल )

राज्य सरकारच्या माहितीनुसार तेलंगणामध्ये एकूण 3,18, 704 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 3,03, 601 जण बरे झाले असून 13, 362 जणांवर अजूनही उपचार सुरु आहेत.

First published:
top videos

    Tags: Covid-19, Jagan mohan reddy, Telangana