नवी दिल्ली, 8 एप्रिल: देशात कोरोना व्हायरसच्या
(Coronavirus) दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर होत आहे. या काळात निवडणूक प्रचारात राजकीय नेत्यांनी कोरोना गाईडलाईन्स मोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणात दिल्ली हायकोर्टात
(Delhi High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर दिल्ली हायकोर्टानं केंद्रीय गृह मंत्रालय
(Home Ministry) आणि निवडणूक आयोगाला
(Election Commission) नोटीस बजावून उत्तर मागितलं आहे. 30 एप्रिलपर्यंत या नोटीशीला उत्तर देण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं नियामवली जारी केली आहे. त्याचं पालन राजकीय सभांमध्ये नेत्यांकडून होत नाही, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं द्यावेत यासाठी आयोगाला निर्देश देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
कुणी दाखल केली याचिका?
उत्तर प्रदेशचे माजी DGP आणि सीएसएससी या थिंक टँकचे संचालक विक्रम सिंह यांनी 17 मार्च रोजी ही याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टानं हे आदेश दिले आहेत.
(
वाचा : Explained: दुसऱ्या लाटेत पुन्हा होऊ शकते कोरोनाची लागण? जाणून घ्या हे 10 मुद्दे )
काय आहे याचिका?
'सामान्य जनतेकडून मास्क न घातल्यास दंड वसूल केला जात आहे. त्याचवेळी राजकीय पक्षांचे नेते उघडपणे विना मास्क फिरत आहेत आणि निवडणूक प्रचार करत आहेत. इतकंच नाही तर राजकीय पक्षांच्या सभेतही कोरोना गाईडलाईन्सचं पालन केलं जात नाही,' अशी तक्रार या याचिकेत करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.