सृजित अवस्थी, प्रतिनिधी पिलीभीत, 11 जून : दुबईत नोकरीसाठी जाणाऱ्या एका तरुणाला फ्लाइटमध्ये बॉम्बचा उल्लेख करणे चांगलेच अंगाशी आले. एवढेच नाही तर यामुळे संपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामा झाला आणि या हाय व्होल्टेज ड्रामामुळे दिल्लीहून दुबईला जाणारे विमान तब्बल 2 तास उशिराने निघाले. मात्र, चौकशीनंतर तरुणाला सोडून देण्यात आले आहे. माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, पिलीभीत येथील अजीम हा 28 वर्षीय तरुण नोकरीच्या निमित्ताने दिल्लीहून दुबईला जात होता. यादरम्यान तो आईशी फोनवर बोलत होता. दरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेने फोन कॉलवर बॉम्बचा उल्लेख ऐकला. बॉम्बची माहिती मिळताच महिलेने घाईघाईने फ्लाइटमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.
प्रवासी फोनवर बॉम्बबद्दल बोलत होता - बॉम्बची माहिती मिळताच दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात असलेल्या सुरक्षा यंत्रणा या संपूर्ण प्रकरणावर तत्काळ सक्रिय झाल्या. यानंतर माहिती देणार्या महिला आणि तरुणाला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. या संपूर्ण प्रकरणा संदर्भात सुरक्षा यंत्रणांनी सुमारे दोन तास या तरुणाची सखोल चौकशी केली. त्याचबरोबर विमानाची सखोल तपासणी करण्यात आली. मात्र, काहीही संशयास्पद न आढळल्याने तरुणाला सोडून देण्यात आले. या संपूर्ण प्रकरणामुळे दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या फ्लाइटला दोन तास उशीर झाला. नारळ काढल्यानंतर तरुण संतापात - पीलीभीत येथील 28 वर्षीय तरुण विमानात चढल्यानंतर आपल्या कुटुंबीयांशी बोलत होता. प्री-बोर्डिंग सुरक्षा तपासणीदरम्यान त्याच्या सामानातून नारळ काढण्यात आला. यावर फोनवर बोलताना त्यांनी कुटुंबीयांना सांगितले की, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गुटख्याची पाकिटे काढली नाहीत तर नारळ काढला. कारण, त्यात बॉम्ब असू शकतो असे त्यांना वाटते. या संवादादरम्यान महिलेने बॉम्ब हा शब्द ऐकला होता आणि हा सर्व गोंधळ झाला.