चंदीगड, 24 जानेवारी : पंजाबमधील (Punjab News) पातियाळाच्या प्रसिद्ध काली माता मंदिरात (Temple) सोमवारी गोंधळ उडाला. येथे एका तरुणाने काली माताच्या प्रतिमेसोबत गैरवर्तणूक केली. तो अचानक मंदिरातील प्रतिमेजवळील ग्रील ओलांडून आसनवर चढला आणि प्रतिमेला मिठी मारली. यानंतर पुजारीन तातडीने तरुणाला खाली उतरवलं. या घटनेनंतर नाराज मंदिर समितीचे सदस्य आणि तेथून भक्तांनी तरुणाला मारहाण केली. यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली केलं. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेस पार्टीचे प्रमुख कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या गैरवर्तणूकीच्या घटनेचा निषेध केला आहे. हे ही वाचा-
खेळता खेळता उकळत्या पाण्यात पडली; उपचाराशिवाय 3 दिवस घरातच तडफडत राहिली
तरुणाने तोंडावर बांधला होता रुमाल आरोपी तरुण सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास मंदिरात पोहोचला. केशरी रंगाचे लोअर आणि जॅकेट घातलेल्या या तरुणाने तोंडाला रुमाल बांधला होता. कोरोनामुळे मंदिर समिती सदस्य आणि पुजाऱ्यांनी याकडे फार लक्ष दिलं नाही. काही वेळ पुतळ्यासमोर उभे राहून टाळ्या वाजवल्यानंतर तो तरुण अचानक ग्रीलवरून उडी मारत आसनावर पोहोचला आणि त्याने काली मातेच्या मूर्तीला मिठी मारली.
पुजाऱ्याने धक्का देऊन हटवलं.. घटनेच्या वेळी पुजारी आणि काही भक्तांशिवाय महिला पोलीस कर्मचारीदेखील मंदिरात हजर होते. तरुणाला आसनावर चढताना पाहून सर्वांनी पुढे येऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. वर चढताच तरुणाने मूर्तीला मिठी मारली. यानंतर पुजाऱ्याने तरुणाना मूर्तीपासून वेगळं केलं. आणि धक्का दिला. तेथील लोक तरुणाला मारहाण करू लागले होते. यानंतर पोलिसांनी कारवाई करीत त्याला ताब्यात घेतलं. सध्या तो पोलिसांच्या अटकेत असून पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.