जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोनामुळे नाही मिळाली बस; 3 रु. 46 पैशांचं कर्ज फेडण्यासाठी बळीराजा 15 किमी गेला पायी

कोरोनामुळे नाही मिळाली बस; 3 रु. 46 पैशांचं कर्ज फेडण्यासाठी बळीराजा 15 किमी गेला पायी

2 हेक्टर जमीन असलेल्यांना याचा फायदा होईल. यासाठी 75 हजार कोटी रुपये दरवर्षी सरकार भरणार.

2 हेक्टर जमीन असलेल्यांना याचा फायदा होईल. यासाठी 75 हजार कोटी रुपये दरवर्षी सरकार भरणार.

लॉकडाऊनमुळे बस सेवा बंद, त्यात शेतकऱ्याकडे सायकलही नव्हती

  • -MIN READ
  • Last Updated :

बंगळुरू / नवी दिल्ली; 27 जून : कर्नाटकातील डोंगरमाथ्यावरील शिमोगा जिल्ह्यात एका शेतकऱ्याला 3 रुपये 46 पैसे इतके कर्ज फेडण्यासाठी 15 किमी चालत जावे लागले. पश्चिम घाटाच्या घनदाट जंगलात बारुवे गावात राहणाऱ्या आमदे लक्ष्मीनारायण या शेतकऱ्याला शहरातील कॅनरा बँकेच्या शाखेतून फोन आला, तेव्हा शुक्रवारी ही घटना घडली. बँकेने त्या शेतकऱ्याला त्वरित कर्ज फेडण्यास सांगितले. कर्जाची रक्कम, कर्जाची परतफेड करण्याची शेवटची तारीख किती आहे याविषयी बँकेकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. बँकेचा असा फोन आल्यानंतर शेतकरी घाबरला आणि शहराकडे निघाला. कोरोना लॉकडाऊनमुळे लक्ष्मीनारायण यांना खेड्यातून कोणतीही बस मिळू शकली नाही, ज्यामुळे तो 15 किमी चालतच निघाला. लक्ष्मीनारायण जेव्हा बँकेत पोहोचले तेव्हा अधिकाऱ्यांनी थकीत कर्जाची रक्कम केवळ 3 रुपये 46 पैसे असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांकडून ही गोष्ट ऐकताच शेतकरी हैराण झाला आणि त्याने तत्काळ कर्जाची रक्कम दिली. हे वाचा- मुंबईला मागे सोडत दिल्ली झाली कोरोना कॅपिटल; धक्कादायक कारण आलं समोर शेतक्याने 35 हजार रुपये घेतले होते कर्ज शेतकर्‍याच्या म्हणण्यानुसार त्याने बँकेकडून 35 हजार रुपयांचे कृषी कर्ज घेतले होते. या कर्जापैकी 32 हजार रुपये शासनाने माफ केले. यानंतर शेतकऱ्याने काही महिन्यांपूर्वी 3 हजार रुपये देऊन सर्व कर्ज फेडले. ते म्हणाले, ‘जेव्हा बँकेने मला ताबडतोब कर्ज भरायला सांगितले तेव्हा मी घाबरून गेलो. लॉकडाऊन असल्याने बस सेवा सुरू नव्हती, माझ्याकडे वाहन नाही.. सायकलही नाही. थकबाकी भरण्यासाठी मी घरातून पायीच निघालो. इथे आल्यावर मला कळले की केवळ 3 रुपये 46 पैशांची रक्कम शिल्लक होती. शेतक्याने 35 हजार रुपये कर्ज घेतले. या प्रकरणात बँकचे प्रबंधक पिंगवा यांनी सांगितले की शाखेत ऑडिटिंगचे काम सुरू आहे. ज्यामध्ये सर्व कर्जाचा निधी क्लिअर करावयाचा होता. त्याशिवाय बँकेला शेतकऱ्याची स्वाक्षरीही हवी होती, त्यामुळे त्यांना फोन करण्यात आला. संपादन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात