हजारीबाग, 16 जुलै : साप पाहून सामान्य माणूस घाबरतो, कारण सापाचा एखादा दंश देखील माणसाच्या मृत्यूचे कारण होऊ शकतो. यामुळेच अनेक लोक सापाला त्यांचा शत्रू मानतात आणि जेव्हाही साप दिसला की त्याला मारण्यासाठी लोक मागेपुढे पाहत नाहीत. परंतु हजारीबागचे रहिवासी आणि पेशाने पत्रकार असणारे मुरारी सिंह हे याच सापांच्या रक्षणासाठी 25 वर्षांपासून अविरत काम करत आहेत. मुरारी सिंग हे पत्रकारितेसोबतच 25 वर्षांपासून सर्पमित्र म्हणून देखील कार्यरत आहेत. आतापर्यंत हजारो सापांची सुटका करून त्यांना सुरक्षित जंगलात सोडण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मुरारी सिंह सांगतात की, ते 12 वीत शिकत असताना त्यांना साप चावला होता. परंतु नशिबाने त्यांना विषबाधा झाली नाही. पण त्यानंतर सापांविषयी जाणून घेण्याची इच्छा त्यांना निर्माण झाली. मग त्यांनी सापांबद्दल वाचायला सुरुवात केली आणि त्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला. बिनविषारी आणि विषारी सापांची सविस्तर माहिती घेतल्यानंतर त्यांची सापांबद्दलची भीती नाहीशी झाली.
मुरारी सिंह सांगतात की, सुरुवातीला त्यांनाही सापांची भीती वाटत होती. यासोबतच त्यांच्या या कामावर घरातील लोकही नाराज असायचे. सर्पदंशामुळे काहीतरी वाईट घडण्याची भीती त्यांच्या मनात होती. मात्र आता घरातील सर्व सदस्य जागरूक झाले आहेत. ते लोकही साप पकडायला शिकले आहेत. कावड यात्रे दरम्यान मोठी दुर्घटना, 6 भक्तांचा मृत्य; असं काय घडलं? मुरारी सिंह सांगतात की, जिल्ह्यात प्रामुख्याने तीन प्रकारचे विषारी साप आहेत. कोब्रा, क्रेट आणि रसेलचे वाइपर. त्यांचा सर्पदंश कोणत्याही प्रजातीसाठी घातक ठरू शकतो. साप पकडताना ते एक काठी आणि एक हातमोजा सोबत ठेवतात. मात्र, आजपर्यंत साप पकडताना त्यांना एकदाही सर्पदंश झालेला नाही.