मराठी बातम्या /बातम्या /देश /अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दारांना बसवणार संगमरवरी चौकटी; मुस्लीम कारागिरांनी केलंय नक्षीकाम

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दारांना बसवणार संगमरवरी चौकटी; मुस्लीम कारागिरांनी केलंय नक्षीकाम

14 दरवाज्यांना पांढऱ्या रंगाच्या संगमरवरी चौकटी बसवल्या जाणार असून त्यावरचं नक्षीकाम मुस्लिम कारागिरांनी केलं आहे.

14 दरवाज्यांना पांढऱ्या रंगाच्या संगमरवरी चौकटी बसवल्या जाणार असून त्यावरचं नक्षीकाम मुस्लिम कारागिरांनी केलं आहे.

14 दरवाज्यांना पांढऱ्या रंगाच्या संगमरवरी चौकटी बसवल्या जाणार असून त्यावरचं नक्षीकाम मुस्लिम कारागिरांनी केलं आहे.

    लखनऊ 12 जुलै : भारतात हजारो वर्षांपासून हिंदू मंदिरं उभारली जातात. देशात झालेल्या अनेक राजा-महाराजांनी, काही संतांनी तर काही मंदिरं अगदी सामान्य माणसांनी उभारली आहेत. त्या-त्या मंदिराचं वैशिष्ट्य असतं. मंदिरात केलेलं कोरीव काम, कळस तिथली शिल्प ही सगळीच वैशिष्ट्य भक्तभाविकांसोबतच पर्यटकांनाही आकर्षित करतात. भारतीयांच्या हृदयात वसणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमवरही (Shriram Janmabhoomi Ayodhya) म्हणजे अयोध्येत आता असंच विशाल मंदिर उभं राहत आहे.

    या मंदिराच्या उभारणीचं काम मोठ्या कंपन्यांना देण्यात आलं आहे. टप्प्याटप्प्याने ही उभारणी सुरू आहे. या मंदिरातल्या पहिल्या मजल्यावरच्या गर्भगृहासाठी पांढऱ्या रंगाच्या संगमरवरी चौकटी बसवण्याचं निश्चित करण्यात आलं असून मकराना येथून या संगमरवरी चौकटी मागवल्या असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे उत्तर प्रदेशचे माध्यम प्रभारी शरद शर्मा यांनी दिली आहे. याबाबतचं वृत्त टीव्ही 9 हिंदीनं दिलं आहे.

    VIDEO: नृसिंहवाडीत दक्षिणद्वार सोहळा; पुराचं पाणी मंदिरात येताच भाविकांनी लुटला स्नानाचा आनंद, का आहे महत्त्व?

    धर्मनगरी अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीवर (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra) रामललाचं भव्य-दिव्य राम मंदिर निर्माणाचं काम प्रचंड वेगाने सुरू आहे. राजस्थानातल्या बन्सी पहाडपूरमधून गुलाबी पाषाण आणण्यात आले असून तेच मंदिरासाठी वापरले जाणार आहेत. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर गर्भगृह असेल ते डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान बांधून पूर्ण होईल.याच काळात गर्भगृहात रामललाच्या (Ramlala) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. या मजल्यावर असलेल्या 14 दरवाज्यांना पांढऱ्या रंगाच्या संगमरवरी चौकटी बसवल्या जाणार असून त्यावरचं नक्षीकाम मुस्लिम कारागिरांनी केलं आहे.

    नव्वदच्या दशकात रामजन्मभूमी न्यासाने भव्य राममंदिराच्या उभारणीसाठी कार्यशाळा (Mandir Workshop in Ayodhya) सुरू केली होती. या कार्यशाळेत बन्सी पहाडपुरातून लाल रंगाचे पाषाण आणूनही ठेवले आहेत. तिथं या पाषाणांवर कोरीव काम सुरू आहे. त्याच कार्यशाळेत आता पहिल्या मजल्यावर बसवण्यात येणाऱ्या संगमरवरी चौकटी आणून ठेवण्यात आल्या आहेत. या चौकटी मुख्य गर्भगृहाला आणि पहिल्या मजल्यावरच्या इतर 13 दारांना बसवण्यात येतील. या दरवाज्यांसाठी बहराइचच्या जंगलांतून शिसं आणि साल वृक्षांचं लाकूड तसंच गोंडा जिल्ह्यातील मनकापूरच्या जंगलातून सागवानाच्या लाकडाचे नमूने मागवण्यात आले आहेत. निर्माण करणाऱ्या संस्थेचे इंजिनीअर संशोधनाअंती मंदिरातील दारं तयार करण्यासाठी कुठलं लाकूड वापरायचं याच्याबद्दल निर्णय घेतील.

    इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास होणार सुस्साट! मुंबई-दिल्ली 'Electric Highway'ची योजना, नितीन गडकरींची माहिती

    विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad)शरद शर्मा म्हणाले, ‘ श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी साडेतीन ते 4 लाख घनफूट पाषाण लागणार आहेत. तसंच दरवाज्यांच्या चौकशी पांढऱ्या संगमरवराने तयार केल्या जातील. हे संगमरवर आधीच इथल्या कार्यशाळेत आणून ठेवलेले आहेत त्यांवर नक्शी कोरण्याचं काम सुरू आहे. हे संगमरवर 2000 वर्षं टिकतात.’

    एकूणातच जगभरातील हिंदूंच्या मनात असलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमीवरील विशाल राम मंदिराची उभारणी प्रचंड वेगाने सुरू आहे आणि त्यात समाजाचे सर्व घटक सहभागी होत आहेत. हे मंदिर जानेवारी 2024 पर्यंत उभारलं जाईल आणि त्यात रामललांची मूर्ती विराजमान होईल अशीच सर्वांची श्रद्धा आहे. सर्व हिंदूबांधव त्या सुवर्णदिनाची वाट पाहत आहेत.

    First published:

    Tags: Proud hindustani muslim, Ram mandir ayodhya