मराठी बातम्या /बातम्या /देश /'काँग्रेसमध्ये राहणार नाही आणि भाजपत....' अमरिंदर यांची मोठी घोषणा

'काँग्रेसमध्ये राहणार नाही आणि भाजपत....' अमरिंदर यांची मोठी घोषणा

 आपण भाजपात जाणार नाही, मात्र काँग्रेसमध्येही राहणार नाही, (Won't go to BJP but not stay in Congress says Amarinder Singh)असं विधान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केलं आहे.

आपण भाजपात जाणार नाही, मात्र काँग्रेसमध्येही राहणार नाही, (Won't go to BJP but not stay in Congress says Amarinder Singh)असं विधान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केलं आहे.

आपण भाजपात जाणार नाही, मात्र काँग्रेसमध्येही राहणार नाही, (Won't go to BJP but not stay in Congress says Amarinder Singh)असं विधान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केलं आहे.

चंदिगढ, 30 सप्टेंबर : आपण भाजपात जाणार नाही, मात्र काँग्रेसमध्येही राहणार नाही, (Won't go to BJP but not stay in Congress says Amarinder Singh)असं विधान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केलं आहे. पंजाबमधील नव्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा झटका (Big jolt to Congress) मानला जात आहे. एका मुलाखतीत कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून ‘ना काँग्रेस-ना भाजप’ (No Congress and No BJP) असं धोरण निश्चित केल्याची घोषणा केली आहे.

काय म्हणाले अमरिंदर सिंह?

सध्या तरी मी काँग्रेस पक्षात आहे, मात्र भविष्यात मी काँग्रेसमध्ये असणार नाही. पक्षात मला मिळालेली वागणूक मान्य नाही. आपण लवकरच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात प्रचार करू, असं अमरिंदर यांनी म्हटलं आहे.

स्वतःचा पक्ष काढणार असल्याची चर्चा

कॅप्टन अमरिंदर सिंह स्वतःचा पक्ष काढतील, अशी जोरदार चर्चा पंजाबच्या राजकीय वर्तुळात आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची ताकद असली तरी त्यात अमरिंदर यांना असलेला पाठिंबा मोठा आहे. अमरिंदर सिंह वेगळे झाल्यानंतर काँग्रेसची पंजाबमधील शक्ती कमी होणार आहे. भाजपची पंजाबमधील मर्यादित ताकद पाहता अमरिंदर सिंह हे भाजपात जाण्याचा पर्याय स्विकारण्याची शक्यता त्यांनी स्वतःच फेटाळून लावली आहे. आम आदमी पक्षाचा प्रभाव दिल्लीच्या तुलनेत पंजाबमध्ये कमी आहे. त्यामुळे इतर कुठल्याही पक्षाचा पर्याय न स्विकारता अमरिंदर सिंह हे स्वतःचा पक्ष काढण्याचा पर्याय निवडतील, अशी सर्वाधिक शक्यता सध्या राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

हे वाचा - अमित शहा यांच्या भेटीनंतर आता कॅप्टन अमरिंदर सिंह कोणाला भेटले?

काँग्रेसला धक्का

एकेका राज्यातून सत्ता जात असताना काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पंजाबमध्येदेखील आता पक्षाच्या गडाला सुरुंग लागत असल्याचं चित्र आहे. अगोदर कॅप्टन अमरिंदर यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याचे आदेश दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनीदेखील पदाचा राजीनामा देत काँग्रेसला दुसरा धक्का दिला होता. आता कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पुढच्या वाटचालीबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

First published:

Tags: BJP, Punjab, काँग्रेस