मुंबई, 9 सप्टेंबर : मुंबईतील (Mumbai) मालाड सायबर सेलने कुणाल अंगोलकर (26) नावाच्या एका एकतर्फी प्रेमीला मालाडमधील (Malad) लिबर्टी गार्डनमधून अटक केली आहे. हा तरुण शेजारी राहणाऱ्या एका विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेम करीत होता. प्रेमात नकार मिळाल्यानंतर हा तरुण तिला वारंवार सेक्स टॉप पाठवित होता आणि तिची मोबाइल क्रमांक पॉर्न साइटवर टाकला होता. या प्रकरणात विद्यार्थिनीने तक्रार केल्यानंतर मालाड पोलिसांनी विनयभंगाचा प्रयत्न आणि आयटी अॅक्टअंतर्गत या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. (He was sending sex toy gifts to the girl he proposed )
प्रप्रोज केल्यानंतर मिळाला होता नकार
या प्रकरणात मालाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे यांनी सांगितलं की, पीडिता 21 वर्षाीय विद्यार्थिनी आहे. ती आरोपीज्या जवळपास राहते. एकाच भागात राहत असल्याने ते एकमेकांना थोडंफार ओळखत होते. यातच आरोपीने तिच्याकडूम मोबाइल नंबर घेतला होता. कुणालने यापूर्वी तिला प्रप्रोज करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र विद्यार्थिनीने त्याला नकार दिला. यानंतर कुणालने विद्यार्थिनीचा मोबाइल नंबर पोर्न साइटवर शेअर केला. त्यानंतर विद्यार्थिनीला वेगवेगळ्या नंबरवरुन कॉल येऊ लागले. याशिवाय कुणाल पीडिताचा नंबर सेक्स टॉय विकणाऱ्या कंपनीला देऊन तिच्या घरी सेक्स टॉयची कॅश ऑन डिलिव्हरी करवत होता.
हे ही वाचा-पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीकडून बॉयफ्रेंडचा खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या घरी अनेकदा सेक्स टॉयचं कुरिअर आलं होतं. सुरुवातील जेव्हा तिला पार्सल उघडून पाहिलं तर त्यात सेक्स टॉय होतं. या बाबत पीडितेने फेब्रुवारी महिन्यात मालाड पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला 9 सप्टेंबरपर्यंत पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.