मराठी बातम्या /बातम्या /देश /

येस्स! आता महिलांनाही मिळणार NDA मध्ये प्रवेश, केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

येस्स! आता महिलांनाही मिळणार NDA मध्ये प्रवेश, केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

या वर्षीपासून महिलांनादेखील (Women) एनडीएमध्ये (National Defense Academy) प्रवेश (Admission) देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती केंद्र सरकारने (Union Government) दिली आहे.

या वर्षीपासून महिलांनादेखील (Women) एनडीएमध्ये (National Defense Academy) प्रवेश (Admission) देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती केंद्र सरकारने (Union Government) दिली आहे.

या वर्षीपासून महिलांनादेखील (Women) एनडीएमध्ये (National Defense Academy) प्रवेश (Admission) देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती केंद्र सरकारने (Union Government) दिली आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर : या वर्षीपासून महिलांनादेखील (Women) एनडीएमध्ये (National Defense Academy) प्रवेश (Admission) देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती केंद्र सरकारने (Union Government) दिली आहे. केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता एनडीएमध्ये महिलांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एनडीए प्रवेशाबाबत लैंगिक समानतेच्या मुद्द्याचा केंद्र सरकार आणि सेनादलाने विचार करावा, अशी विनंती कोर्टाने केली होती. त्यानंतर सरकारने आपला पवित्रा बदलून आता एनडीएचे दरवाजे महिलांसाठी उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे प्रकरण

एनडीमध्ये महिलांना प्रवेश नाकारणे, हा समानतेच्या अधिकाराचा भंग असल्याची तक्रार नोंदवत एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यावर इतर सर्व ठिकाणांप्रमाणे एनडीए प्रवेशाबाबत महिलांना वेगळा न्याय का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला होता. त्यावर UPSC मार्फत महिलांना सैन्यातील सेवेची संधी मिळत असल्यामुळे एनडीएत महिलांना प्रवेश देण्याची गरज नाही, असा मुद्दा केंद्र सरकारकडून मांडण्यात आला होता.

समानतेचा मुद्दा

एनडीएनत मुलांप्रमाणे मुलींना प्रवेश नसणे, हा लैंगिक असमानतेचा मुद्दा असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं. याबाबत विचार करण्याची विनंती सुप्रीम कोर्टानं सरकारला केली होती. त्यानुसार बुधवारी झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारनं आपली भूमिका बदल या वर्षीपासून मुलींनाही एनडीएमध्ये प्रवेश देणार असल्याची माहिती दिली.

हे वाचा - 'लेट लतिफ' ट्रेनला बसला 30000 रुपयांचा दंड! सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

कोर्टाने केले स्वागत

सरकारच्या या निर्णयाचं न्यायालयानं स्वागत केलं आहे. न्यायालयाने आदेश देण्यापूर्वीच सरकारनं हा निर्णय घेतल्यामुळे आता महिलांना सैन्य प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. हे नवं धोरण असून त्यात सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं वेळ मागण्यात आला. त्यावर कोर्टानं सरकारला 10 दिवसांची मुदत दिली आहे.

सरकारच्या नव्या धोरणानुसार आता एनडीए आणि राष्ट्रीय पातळीवरच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये महिलांना प्रवेश मिळणार आहे. याबाबतचं नेमकं धोरणं आणि तरतुदी समजण्यासाठी किमान 10 दिवस थांबावं लागणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सैन्यात जाण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या लाखो तरुणींना नवी उमेद मिळाली आहे.

First published:

Tags: Military, NDA, Women